शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेला सुरूंग ; सिंधुदुर्ग राज्यात चौथ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:34 IST

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरली असल्याचे आजच्या शिक्षण समिती सभेत उघड झाले. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात प्रथम असणारा सिंधुदुर्ग यावर्षी मात्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. केंद्र शासनाच्या असर नामक एका खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेत हा निकाल समोर आला आहे. दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी याची गंभीर दखल घेऊन शिक्षकांची मानसिकता सकारात्मक करण्यासाठी येत्या काळात शिक्षण परिषद घेणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेला सुरूंग ; सिंधुदुर्ग राज्यात चौथ्या स्थानीशिक्षण समिती सभा; विचारमंथनासाठी शिक्षण परिषदचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरली असल्याचे आजच्या शिक्षण समिती सभेत उघड झाले. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात प्रथम असणारा सिंधुदुर्ग यावर्षी मात्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. केंद्र शासनाच्या असर नामक एका खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेत हा निकाल समोर आला आहे. दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी याची गंभीर दखल घेऊन शिक्षकांची मानसिकता सकारात्मक करण्यासाठी येत्या काळात शिक्षण परिषद घेणार असल्याचे सांगितले.शिक्षण विभागाची मासिक सभा जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ नाथ पै सभागृहात पार पडली.यावेळी समिती सचिव तथा शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर,सदस्य सरोज परब, संपदा देसाई,विष्णूदास कुबल, सुनील म्हापणकर, राजेंद्र म्हापसेकर, उन्नती धुरी , यांसह गटशिक्षणाधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात प्रथम क्रमांकावर असणारा आपला जिल्हा यावर्षी चौथ्या क्रमांकावर गेल्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सभागृहात सांगितले. ते पुढे म्हणाले केंद्राच्या असर संस्थेने 2018 मध्ये गुणवत्ता विषयक सर्वे केला होता. यात गणित व वाचन या प्रमुख दोन विषयांचे मुल्यमापन करण्यात आले होते.

इयत्ता तिसरी ते पाचवी मधील विद्यार्थी वाचन मध्ये राज्यात सहाव्या क्रमांकावर आहेत. तर गणितात राज्यात चौथ्या क्रमांकावर आहेत. सहावी ते आठवी मधील विद्यार्थी वाचनामध्ये तिस?्या तर गणितात पहिल्या क्रमांकावर आहेत. असे आंबोकर यांनी सांगितले. तर याबाबत विचार मंथन व शिक्षकांमध्ये सकारात्मकता आणण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षांत शिक्षण परिषद आयोजित करणार असल्याचे ते म्हणाले.पुढच्या वर्षी जिल्हा राज्यात अव्वल असणारसिंधुदुर्ग जिल्हा गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अव्वल होता. मात्र यावर्षी तो चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. ही सर्व वस्तुस्थिती विचारात घेऊन पुढच्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा राज्यात अव्वल स्थानावर असेल असा विश्वास शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केला. यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग