CoronaVirus In Kankavli : पोलीस अधीक्षक थेट रस्त्यावर उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 17:48 IST2021-05-13T17:45:50+5:302021-05-13T17:48:02+5:30
CoronaVirus Kankavli Police Sindhudurg : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई - गोवा महामार्ग आणि कणकवली शहरातील रस्त्यावरील वर्दळ कमी होत नसल्याने अखेर कणकवली पोलिसांनी दुचाकीस्वारांवर बुधवारी सकाळच्या सत्रात कारवाई सुरू केली.

कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सूचना दिल्या.
कणकवली : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई - गोवा महामार्ग आणि कणकवली शहरातील रस्त्यावरील वर्दळ कमी होत नसल्याने अखेर कणकवली पोलिसांनी दुचाकीस्वारांवर बुधवारी सकाळच्या सत्रात कारवाई सुरू केली.
कणकवली पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला हे स्वतः कारवाईसाठी शहरातील आप्पा साहेब पटवर्धन चौकातील रस्त्यावर उतरल्याने कणकवली शहरात बुधवारी सकाळपासूनच पोलिसांकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यात विनाकारण फिरणाऱ्यांना कारवाईचा दणका देत असतानाच काही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी बुधवारी सावंतवाडी, बांदा, कुडाळ, कणकवली येथील बंदोबस्तावरील आपल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आरोग्य आणि महसूल पथकातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ऑन फिल्ड ड्युटी करीत त्यांना प्रोत्साहन दिले आहे. कणकवलीतील आप्पा साहेब पटवर्धन चौकात पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे वाहनचालकांची मात्र तारांबळ उडत होती.