शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:59 IST

उन्हाळी सुट्टीत होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर १९ एप्रिल ते ११ मे या कालावधीत आणखी दोन उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत. या मार्गावर पर्यटक तसेच प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने रेल्वेने मुंबई - सीएटी मार्गावर या दोन गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी गाड्यारेल्वे प्रशासनाकडून जाहीर

कणकवली : उन्हाळी सुट्टीत होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर १९ एप्रिल ते ११ मे या कालावधीत आणखी दोन उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत. या मार्गावर पर्यटक तसेच प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने रेल्वेने मुंबई - सीएटी मार्गावर या दोन गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.रेल्वे प्रशासनाकडून नव्याने जाहीर करण्यात आलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांपैकी मुंबई सीएसटी-करमाळी (०१००३/०१००४) ही गाडी १९ एप्रिल ते १० मे या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. सीएसटीहून ही गाडी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी सुटेल. आणि गोव्यात करमाळी स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २१ एप्रिल ते १२ मे २०१९ या कालावधीत दर रविवारी करमाळी-मुंबई मार्गावर धावेल.

करमाळीहून ही गाडी दुपारी १२.५० वाजता सुटेल . दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० वाजता मुंबईत सीएसटी स्थानकावर पोहोचेल. दुसरी विशेष गाडी (०१००६/०१००५) ही देखील करमाळी ते सीएसटी मार्गावर धावणार आहे. २० एप्रिल ते ११ मे २०१९ या कालावधीत ही गाडी दर शनिवारी करमाळीहून दुपारी १२.५० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ११ वाजता ५५ मिनिटांनी मुंबईत सीएसटीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २१ एप्रिल ते १२ मे २०१९ या कालावधीत दर रविवारी धावणार आहे. ही गाडी सीएसटीहून रात्री १२.४५ वाजता सुटून त्याच दिवशी ती दुपारी १२.२० वाजता करमाळीला पोहोचेल.या दोन्ही अतिरिक्त गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकांवर थांबणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या दोन गाड्यांच्या १६ फेऱ्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर जून महिन्यापर्यंत धावणाºया स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या आता तब्बल १८० वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी