वीज खांबावर अचानक आग, बांदा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 16:02 IST2020-09-08T16:00:56+5:302020-09-08T16:02:06+5:30
बांदा बस स्थानकानजिकच्या वीज खांबावरील जम्प स्पार्क होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी वीजखांबानजिक अनेक दुकाने असल्याने या प्रकाराने एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी वीज वितरण कंपनीला याबाबत कल्पना दिल्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. यामुळे मोठा अनर्थ टळला.

बांदा एसटी स्थानकानजीक वीज खांबावरील जम्प स्पार्क होऊन अचानक आग लागली. (छाया:अजित दळवी)
बांदा : बांदा बस स्थानकानजिकच्या वीज खांबावरील जम्प स्पार्क होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी वीजखांबानजिक अनेक दुकाने असल्याने या प्रकाराने एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी वीज वितरण कंपनीला याबाबत कल्पना दिल्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. यामुळे मोठा अनर्थ टळला.
गेली काही वर्षे या पोलवर कायम आग लागण्याचे प्रकार होतात. पोलच्या खालील काही दुकानात विजचा करंट येण्याचे प्रकार सुरु असल्याचे स्थानिक दुकानदारांकडून सांगण्यात आले. प्रत्येकवेळी संबंधित विभागाचे कर्मचारी तात्पुरते तांत्रिक दोष दूर करुन वेळ मारुन नेतात असा स्थानिकांचा आरोप आहे.
जम्पला स्पार्क होऊन अचानक आग लागली. आगीचे लोळ दिसताच परिसरात घबराट पसरली. पोलनजीक मोठ्या प्रमाणात टपरीवजा दुकाने आहेत. स्थानिकांनी वीज वितरणला याबाबत माहिती दिल्यानंतर वायरमन कांबळे व एल. व्ही. घोगळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.