पर्यटनवृद्धीसाठी जिल्ह्याचा अभ्यास करा

By Admin | Updated: January 25, 2015 00:50 IST2015-01-25T00:50:54+5:302015-01-25T00:50:54+5:30

विजयकुमार वळंजू : गोपुरीत जिल्हास्तरीय पर्यटन विकास कार्यशाळा

Study the district for flourishing tourism | पर्यटनवृद्धीसाठी जिल्ह्याचा अभ्यास करा

पर्यटनवृद्धीसाठी जिल्ह्याचा अभ्यास करा

कणकवली : सिंधुदुर्गात पर्यटनवृद्धीसाठी खूप संधी आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा साकल्याने अभ्यास करण्याची गरज आहे. परदेशी पर्यटनातील शिस्त आणि स्वच्छता अंगी बाणवल्यास पर्यटन वृद्धी होऊ शकते, असे प्रतिपादन कणकवली शिक्षणप्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांनी केले.
गोपुरी आश्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हास्तरीय पर्यटन विकास कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
बाळासाहेब वळंजू म्हणाले की, कॉलेज शिक्षण व्यवस्थित पूर्ण करून मग टुरिस्ट गाईड होण्यासाठी विचार करा. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा इतिहास पर्यटकांच्या समोर उभा करता आला पाहिजे.
पर्यटनक्षेत्रातील विविध पैलूंचा अभ्यास करा. आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, समुद्री पर्यटन आदी विविध क्षेत्रे उपलब्ध आहेत.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. खंडेराव कोतवाल, जिल्हा क्षेत्र समन्वयक प्रा. कैलास राबते, प्रा. एस. के. बांबुळकर, प्रा. डॉ. संभाजी शिंदे आदी उपस्थित होते.
प्रसाद पुजारे याने सूत्रसंचालन केले. हे निवासी शिबिर रविवारी सायंकाळपर्यंत सुरू राहणार असून पर्यटनअंतर्गत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.
४विजयदुर्गनजीकची आंग्रिया बॅँकसारखी महत्त्वाची पर्यटनस्थळे दुर्लक्षित असून शासनाने ती विकसीत केली पाहिजेत.
४आमचे किल्ले ढासळत आहेत. परदेशात कृत्रिम पर्यटनस्थळे विकसीत विशेष लक्ष देऊन केली जातात. मात्र आपण पर्यटनस्थळांकडे दुर्लक्ष करतो.
४मॉरिशसपेक्षा गोवा कितीतरी सुंदर आहे. मात्र, खाणउद्योगाने गोव्याचे सौंदर्य बाधित झाले आहे.
४पर्यटन विकसीत करण्यासाठी व्यवस्थेचा अभाव आहे.
४पर्यटनाचे शिक्षण कितीही घेतले तरी सुसंस्कृतपणा पाहिजे.
४भारताचे वैभव काय आहे याचा अभ्यास करून ते सादर करता आले पाहिजे.


 

Web Title: Study the district for flourishing tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.