सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 27, 2023 13:21 IST2023-02-27T13:15:08+5:302023-02-27T13:21:53+5:30
सिंधुदुर्ग : येथील सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिक्षण घेणारा आशिष गेहालयान (१९) याने आज, सोमवारी पहाटे तो ...

सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
सिंधुदुर्ग: येथील सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिक्षण घेणारा आशिष गेहालयान (१९) याने आज, सोमवारी पहाटे तो राहत असलेल्या वसतिगृह इमारतीच्या एका खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. तो मूळ हरियाणा करणाल येथील होता. प्रॅक्टिकल सुरू असताना त्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून ओरोस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत देवरे अधिक तपास करीत आहेत.
सोमवारी पहाटे तो राहत असलेल्या वसतिगृहातील इमारतीत आपल्या खोलीत गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. गेल्या वर्षभरापासून तो या वस्तीगृहाच्या खोलीत राहत होता. पहिल्या वर्षाची वैद्यकीय महाविद्यालयाची प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाली होती. सोमवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. १९ वर्षीय या विद्यार्थ्याने पहिल्या वर्षाच्या अखेरीस वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण घेत असताना आत्महत्या केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.