शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी सेवा बंद असल्याने दुचाकीने निघाला कॉलेजला, अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू; कणकवली तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 13:41 IST

एस.टी सेवा बंद असल्याने शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने शाळेत येत असतात

खारेपाटण : मुंबई - गोवा महार्गावर नडगिवे घाटीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नडगिवेच्या समोर दुचाकी अपघातात एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. स्वामी विराट राणे (वय १८, रा. तळेरे गावठण) असे या मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.आज, सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. एस.टी सेवा बंद असल्याने तो दुचाकीवरु कॉलेजला निघाला असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण तसेच तळेरे विभागात हळहळ व्यक्त होत होती.याबाबत अधिक माहिती अशी की, स्वामी राणे हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. खारेपाटण ज्युनिअर कॉलेज १२ वी सायन्स वर्गात तो शिकत होता. १२ वी सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या सध्या बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असून या परीक्षेकरिता तो कॉलेजमध्ये निघाला होता. मात्र, एस टी गाड्या बंद असल्याने  मोटारसायकलने तो कॉलेजला जात होता.दरम्यान, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगीवे घाटीत दुचाकीवरील ताबा सूटल्याने दुचाकी रस्त्याच्या साईटला लोखंडी संरक्षक गार्डवर आदळली. यामध्ये त्याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने स्वामीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरक्षक सचिन हुंदळेकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी  घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.  एस.टी बस सेवा सरु करण्याची मागणीएस टी सेवा बंद असल्याने त्यांचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने शाळेत येत असतात. तरी शालेय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान आणि जीवघेणे रस्ते अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लवकरच एस टी बसेस गावागावात सुरू करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातST Strikeएसटी संपStudentविद्यार्थी