आंबोलीत २ जुन पासून आठ दिवस कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 13:17 IST2021-06-01T13:15:01+5:302021-06-01T13:17:06+5:30
CoronaVirus Sawantwadi Sindhdurg : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावात २ जुन बुधवारपासून आठ दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय आज ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती.

आंबोलीत २ जुन पासून आठ दिवस कडकडीत बंद
सावंतवाडी : तालुक्यातील आंबोली गावात २ जुन बुधवार पासून आठ दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय आज ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती.
यावेळी या बैठकीला कोरोना समितीची अध्यक्ष , गावचे सरपंच, उपसरपंच दत्तू नार्वेकर, पोलिस पाटील विद्या चव्हाण, पोलिस हे. को. दत्ता देसाई, ग्रामविकास अधिकारी, सदस्य उपस्थित होते. यावेळी आंबोली मध्ये सापडत असलेल्या रुग्ण संख्या रोखण्यासाठी २ जुन बुधवार पासून ८ दिवस कडकडीत बंद पाळण्यात येण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी विलगी करण कक्षात निर्माण होत असलेल्या पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी स्वतः तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आपण जबाबदारी घेतो. असे सांगितले आहे. यावेळी त्यांनी रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य अधिकारी यांनी वेळीच रुग्णांची तपासणी करावी अशा सूचना दिल्या आहेत.