शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्यावतीने रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:22 IST2021-01-27T15:20:40+5:302021-01-27T15:22:16+5:30
Farmar Sindhudurg- देवगड तालुक्यातील नारिंग्रे-बुधवळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोटकामते ग्रामपंचायत शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्यावतीने कोटकामते भगवती मंदिर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मात्र, तीन किलोमीटरचा रस्ता बनवून देण्याचे लेखी आश्वासन बांधकाम विभागाकडून दिल्यानंतरच उपोषण स्थगित करण्यात आले.

कोटकामते ग्रामपंचायत शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्यावतीने कोटकामते भगवती मंदिर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
देवगड : देवगड तालुक्यातील नारिंग्रे-बुधवळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोटकामते ग्रामपंचायत शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्यावतीने कोटकामते भगवती मंदिर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मात्र, तीन किलोमीटरचा रस्ता बनवून देण्याचे लेखी आश्वासन बांधकाम विभागाकडून दिल्यानंतरच उपोषण स्थगित करण्यात आले.
रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता रस्त्याचे डांबरीकरण करा अशी वारंवार विनंती येथील ग्रामस्थांकडून करूनही खड्डे भरण्याचे सोपस्कार करायचे. लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, शासन यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच आज गावातील नागरिकांनी रास्तारोको करण्याचा पवित्रा घेतला.
कोटकामते ग्रामपंचायत व शेतकरी क्रांतिकारी संघटना यांच्या माध्यमातून सोमवारी सकाळी या रास्तारोको आंदोलनाला सुरुवात झाली. या मार्गावरून जाणारी खुडीपाट देवगड ही गाडी अडविण्यात आली. गाडी अडविल्यामुळे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, देवगड पोलीस निरीक्षक संजय कातिवले आंदोलनस्थळी हजर होत त्यांनी तत्काळ अडविलेली एसटी पूर्वी मार्गस्थ करण्याची सूचना केली. त्यानुसार पोलिसांनी रस्ता मोकळा करीत एसटी मार्गस्थ केली.
एसटी मार्गस्थ झाल्यानंतर पुन्हा ग्रामस्थांनी मार्ग बंद केला. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ घोषणा देत आंदोलन सुरू ठेवले. साडेतीन तासानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शेवाळे व पाटील आंदोलनस्थळी दाखल झाले.