शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ उद्घाटन तारखेंचा खेळ थांबवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 18:40 IST

Chipi airport Sindhudurgnews-चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या तारखा अनेकदा विविध राजकीय व्यक्तींकडून जाहीर झाल्या आहेत. मात्र, अजूनही विमानतळाचे उदघाटन झालेले नाही. त्यामुळे तारखेंचा हा खेळ करीत जनतेची चाललेली चेष्टा थांबवा. पहिल्यादा केंद्रीय उड्डाण समितीची परवानगी घा आणि त्यानंतरच उदघाटनाची तारीख जाहीर करा, असे आवाहन केंद्र व राज्य शासनातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे. कणकवली येथे मनसे संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठळक मुद्देविमानतळ उद्घाटन तारखेंचा खेळ थांबवा !परशुराम उपरकर यांचे सत्ताधाऱ्यांना आवाहन

कणकवली : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या तारखा अनेकदा विविध राजकीय व्यक्तींकडून जाहीर झाल्या आहेत. मात्र, अजूनही विमानतळाचे उदघाटन झालेले नाही. त्यामुळे तारखेंचा हा खेळ करीत जनतेची चाललेली चेष्टा थांबवा. पहिल्यादा केंद्रीय उड्डाण समितीची परवानगी घा आणि त्यानंतरच उदघाटनाची तारीख जाहीर करा, असे आवाहन केंद्र व राज्य शासनातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे. कणकवली येथे मनसे संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील सध्याच्या भाजपा खासदारांनी महसूलमंत्री, उद्योगमंत्री तसेच पालकमंत्री असताना अनेकदा चिपी विमानतळाच्या ठिकाणी दगडी पाटी लावत त्यावर आपली नावे कोरली. तर शिवसेनेच्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी गणेश चतुर्थी दरम्यान गणेश मूर्ती आणत विमान उतरवले. शिवसेनेच्या आताच्या खासदारांनी पुन्हा एकदा १ मार्चला विमानतळाचे उद्घाटन करण्याचे जाहीर केले होते. पण अद्याप उद्घाटन होवू शकलेले नाही. ही एकप्रकारे राज्यकर्त्यांनी जनतेची चेष्टा चालवली आहे.मनसेच्यावतीने आम्ही यापूर्वीच पुढील दोन ते तीन महिने विमानतळ सुरू होणार नाही असे सांगितले होते. १ मार्चला केंद्रीय उड्डाण समिती विमानतळाची पाहणी करायला आली. त्यांनी तिथे त्रुटी आहेत असे सांगितले.

सध्याच्या मुख्यमंत्र्यांनीही उदघाटनाची तारीख जाहीर केली होती. पण अद्याप विमानतळ चालू झालेला नाही. सध्याचे शिवसेना खासदार भाजपच्या खासदारांना नरकासूर असे यापूर्वी म्हणत होते.पण अलीकडेच एका कार्यक्रमात ते त्यांना आदरणीय असे म्हणाले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही खासदारांनी चिपी विमानतळ लवकर सुरू होण्यासाठी एकत्र यावे.

विमानतळासाठी अवघ्या १५० रुपये गुंठ्यानी जमीन दिलेल्या लोकांना तिथे विमान उतरल्याचे पाहूण समाधान मिळेल . यासाठी प्रयत्न करावे. सत्ताधारी शिवसेना खासदारांनी कुडाळ येथे महिलासाठी रुग्णालय सुरू होणार असल्याची अनेकदा घोषणा केली. मात्र , अद्याप ते रुग्णालय सुरु झालेले नाही. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग