मालवणच्या राजकोट किनाऱ्यावरील शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला, निकृष्ट बांधकामावर शिवप्रेमी संतप्त
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 26, 2024 14:50 IST2024-08-26T14:42:42+5:302024-08-26T14:50:48+5:30
संदीप बोडवे मालवण : मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आज, सोमवारी दुपारी ...

मालवणच्या राजकोट किनाऱ्यावरील शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला, निकृष्ट बांधकामावर शिवप्रेमी संतप्त
संदीप बोडवे
मालवण : मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आज, सोमवारी दुपारी घडली. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त झाले होते.
४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. छत्रपतींचा पुतळा कोसळल्यामुळे येथील शिवप्रेमी संतप्त झाले असून निकृष्ट बांधकामामुळे हा पुतळा पडला असल्याचा आरोप केला आहे.
राजकोट येथे शिवपुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी आणि इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती. राज्य शासन आणि नौदल विभागाने निश्चित केल्या नंतरच राजकोट येथील जागेवर पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच होता. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता.