शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

राजकोट येथील पुतळा भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे द्या, पोलिस अधिकाऱ्यांची वैभव नाईकांना नोटीस; नोटीसला दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:20 IST

कणकवली: मालवण - राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी ...

कणकवली: मालवण - राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री व अधिकाऱ्यांवर केला आहे.त्या पार्श्वभूमीवर कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी वैभव नाईक यांना त्यांनी केलेल्या आरोपांबाबत उपलब्ध पुरावे चार दिवसात सादर करून तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी त्या नोटिसीला उत्तर दिले आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना इमेल केले आहे. या पत्रात म्हटले आहे कि, मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आपण माझ्याकडे माहिती मागविली आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे काम नौदलाने केले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर जाहीर केले आहे. मात्र, पुतळा सुशोभिकरण आणि नौदल दिनाचा खर्च अनुक्रमे सार्वजनिक बांधकाम विभाग ,कणकवली यांनी २.५ कोटी रुपये, आणि जिल्हा नियोजन सिंधुदुर्ग यांनी ५.५ कोटी रुपये खर्च केला असल्याची लेखी माहिती मला संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे नौदलाचे हे काम असेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली, आणि जिल्हा नियोजन सिंधुदुर्ग यांनी केलेला खर्च कुठे गेला? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे नौदल दिनानिमित्त नौसेनेने केलेल्या खर्चाचा तपशील देण्याबाबत नौसेना अधिकाऱ्यांशी मी पत्रव्यवहार केला आहे. नौसेनेने अद्याप याबाबत माहिती दिलेली नसून नौसेनेकडून ती माहिती मिळताच त्याबाबतची माहिती आपल्याला देण्यात येईल. केलेल्या कारवाईची माहिती द्याहा अत्यंत संवेदनशील विषय असून महाराष्ट्रात घडणाऱ्या अशा संवेदनशील विषयात पोलिस अधिकाऱ्यांकडून केलेल्या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवली जाते. मात्र,राजकोट पुतळा प्रकरणातील केलेला तपास, अटक केलेले आरोपी जयदीप आपटे, चेतन पाटील यांनी दिलेले जबाब, अन्य संशयित आरोपींना अटक कधी होणार ? याबाबत कोणतीच माहिती प्रसारमाध्यमांना आणि जनतेला आपण दिलेली नाही. त्या प्रकरणाबाबत केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती जनतेसाठी लवकरात लवकर जाहीर करावी. असेही वैभव नाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराrajkot-pcराजकोटShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPoliceपोलिसVaibhav Naikवैभव नाईक