शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील महामार्गावरील पथदीप सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 19:45 IST

highway Kankavli Sindhudurg : कणकवली शहरातील गांगो मंदिर ते गडनदी पुलापर्यंतचे अनेक पथदीप गेले काही महिने बंद आहेत. वारंवार हे पथदीप सुरू करण्याची मागणी करूनही महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे दोन दिवसांत पथदीप सुरू न केल्यास आमची स्टाईल दाखवावी लागेल, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणला दिला.

ठळक मुद्देकणकवलीतील महामार्गावरील पथदीप सुरू करा समीर नलावडे यांची महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनीला सूचना

कणकवली : शहरातील गांगो मंदिर ते गडनदी पुलापर्यंतचे अनेक पथदीप गेले काही महिने बंद आहेत. वारंवार हे पथदीप सुरू करण्याची मागणी करूनही महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे दोन दिवसांत पथदीप सुरू न केल्यास आमची स्टाईल दाखवावी लागेल, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणला दिला.त्यानंतर रविवारी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी नगरपंचायतीमध्ये दाखल होत दोन दिवसांत पथदिव्यांची कामे मार्गी लावतो, असे त्यांनी आश्वासन दिले. अनेकदा सूचना देऊनही जर कामे होत नसतील तर आम्हांला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. पावसाळा तोंडावर आलेला असतानाच शहरातील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पथदिवे बंद आहेत. यामुळे पावसाळ्यात शहरात महामार्गावर काळोखाचे वातावरण राहणार आहे. जर दोन दिवसांत चौपदरीकरणाअंतर्गतचे पथदीप सुरू न झाल्यास आमचा हिसका दाखवावा लागेल, असा इशारा नलावडे यांनी दिला.त्यानंतर महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता मणियार, शाखा अभियंता गणेश महाजन, ठेकेदार कंपनीचे अधिकारी आदींनी तत्काळ नगरपंचायतीमध्ये धाव घेत नगराध्यक्षांची चर्चा केली. यावेळी नगरसेवक अभिजित मुसळे, गटनेते संजय कामतेकर आदी उपस्थित होते.यापूर्वी अनेकदा सूचना देऊन झाल्या. तरी ही कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्यावेळी अंधारातून प्रवास करावा लागतो. दोन दिवसांत हे काम सुरू न झाल्यास आमच्या स्टाईलने काम करून घेतले जाईल, असा इशारा नगराध्यक्षांनी दिला. त्यावर येत्या दोन दिवसांत शहरातील महामार्गालगतचे पथदीप सुरू करण्याबाबत ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. 

टॅग्स :highwayमहामार्गKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग