शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 10:43 IST

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २१ व्या जिल्हास्तरीय कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्कोच्या भव्य मैदानावर प्रारंभ झाला. प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला सुरुवात झाली. प्रथमच शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्याला ड्रेस कोड दिल्याने आठ तालुक्याचे आठ रंगाच्या स्पोर्ट गणवेशात विद्यार्थी तर शिक्षकही स्पोर्ट गणवेशात मैदानात उतरले आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभप्रत्येक तालुक्याला ड्रेस कोड : शिक्षकही स्पोर्ट गणवेशात मैदानात

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या २१ व्या जिल्हास्तरीय कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्कोच्या भव्य मैदानावर प्रारंभ झाला. प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला सुरुवात झाली. प्रथमच शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्याला ड्रेस कोड दिल्याने आठ तालुक्याचे आठ रंगाच्या स्पोर्ट गणवेशात विद्यार्थी तर शिक्षकही स्पोर्ट गणवेशात मैदानात उतरले आहेत.यावेळी गटनेते सतीश सावंत, महिला व बाल कल्याण सभापती पल्लवी राऊळ, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, विषय समिती सभापती जेरॉन फर्नांडिस, डॉ अनिशा दळवी, फादर क्लाईव्ह टेलिस, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी भारती संसारे, रामचंद्र आंगणे, शिक्षक संघटना पदाधिकारी नंदकुमार राणे, चंद्रसेन पाताडे, संतोष पाताडे, अरुण पवार, के टी चव्हाण, कणकवली सभापती सुजाता हळदीवे, पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, पंढरी राऊळ आदी उपस्थित होते.सुरुवातीला वेताळ बांबार्डे शाळेच्या मुलांनी ह्यबेटी बचाव, बेटी बढाव, या विषयावर गितनृत्य सादर करीत लक्ष वेधले. या महोत्सवाला सहकार्य करणाऱ्या माउली ट्रस्ट मालवणचे पदाधिकारी, फादर क्लाईव्ह यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कसाल केंद्रातील पडवे शाळेतील मुलांनी लक्षवेधी संचालन केले.३६६ मुलांचा होणार सन्मानप्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर म्हणाले की, जिल्हा परिषदेने कला, क्रीडा आणि ज्ञानी मी होणार महोत्सव सुरु करून २१ वर्षे झाली. या २१ वर्षात प्रथम विजेत्या मुलांना सुवर्ण, रजत व कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ३६६ मुलांचा असा सन्मान होणार आहे. या स्पर्धेत छोट्या गटासाठी ११ तर मोठ्या गटासाठी १२ स्पर्धा होणार आहेत.

१५०४ मुलांना त्या-त्या तालुक्याप्रमाणे विविध रंगाचे मोफत गणवेश वाटप करण्यात आले आहेत. १७४ मुलांना सुवर्ण तर १७४ मुलांना रजत आणि १८ कांस्य पदक देण्यात येणार आहेत. यावर्षी प्रथमच लंगडी खेळाचा समावेश करण्यात आला आहे. मुली व मुलगे यांच्यासाठी स्वतंत्र स्पर्धा होणार आहेत. समूहगीत स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक मुलांना रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर समूहगीत गाण्याची संधी मिळणार आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.शिक्षण विभागाचे उपक्रम कौतुकास्पदसतीश सावंत यांनी, यासाठी जिल्हा परिषद निधीची तरतूद करते. मात्र, सर्वात जास्त समाधान शिक्षण विभागाला केलेल्या तरतुदीमुळे अधिक समाधान मिळाले. शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची मानसिकता सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. रणजित देसाई यांनी, जिल्हास्तरीय स्पर्धेमुळे येथे खेळाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरु केलेले उपक्रम राज्यात राबविले जातात. मुलांनी हि स्पर्धा खिलाडू वृत्तीने घ्यावे. हार स्वीकारा आणि विजय संयमाने घ्या, असे आवाहन केले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग