Star fence at 'that' disputed place in Sawantwadi, decision of the municipality | सावंतवाडीतील 'त्या' वादग्रस्त जागेवर तारेचे कुंपन, नगरपालिकेचा निर्णय

सावंतवाडीतील 'त्या' वादग्रस्त जागेवर तारेचे कुंपन, नगरपालिकेचा निर्णय

सावंतवाडी : रवी जाधव यांनी लावलेल्या स्टॉलच्या जागेला आता तारेचे कुंपन करण्यात आले असून, या ठिकाणी कुणालाच बसण्यास दिले जाणार नाही, असे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे. ही जागा मागील सहा महिन्यापासून वादग्रस्त बनली होती.

रवी जाधव यांनी गांधी चौकात डिक्री केलेल्या जागेत तात्पूरता स्वरूपात स्टॉल उभारला होता. मात्र नंतर हा स्टॉल चांगलाच वादग्रस्त बनला. पालिकेची मुदत संपल्यानंतर हा स्टॉल तसाच ठेवण्यात आल्याचे कारण देत नगरपालिकेने हा स्टॉल हटवला होता. त्यानंतर जाधव यांनी उपोषण ही केले होते. मात्र, नंतर पुन्हा त्याच जागेवर स्टॉल उभारण्यात आला. तो पुन्हा पालिकेकडून काढून टाकण्यात आला होता.

हा प्रकार गेली सहा महिने सुरू होता. रवी जाधव यांचा स्टॉल काढल्यानंतर त्या जागेवर अन्य व्यक्ती कोणतरी स्टॉल लावत, असे त्यामुळे पालिकेवर सतत टीका होत होती. चार दिवसापूर्वी दलित यूथ पॅथरच्या पदाधिकाऱ्यांनीही सावंतवाडीत येऊन त्याच जागेवर स्टॉल उभा केला होता. नंतर पालिकेने तोही स्टॉल काढून टाकला होता. 

मात्र आता नगरपालिकेने याच जागेवर तारेचे कुंपन घालण्याचा निर्णय घेतला यासाठी नगरपालिकेने जागेची मोजमाप ही केले असून, सांयकाळी उशिरापर्यंत याच जागेवर तारेचे कुंपन घालण्याचे काम सुरू होते. याबाबत पालिका कर्मचारी टि.पी.जाधव यांना विचारले असता या ठिकाणी तारेचे कुंपन उभारण्यात येणार असून,आता कुणाला ही येथे स्टॉल उभारण्यास देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 

Web Title: Star fence at 'that' disputed place in Sawantwadi, decision of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.