शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांनी कुटुंबीयांसह केले आक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:15 IST

Statetransport, diwali, kankavli, sindhudurnews एसटी कर्मचाऱ्यांचे दिवाळी सणापूर्वी दोन महिन्यांचे थकित वेतन मिळावे. तसेच महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी. अशा विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने आक्रोश आंदोलन सोमवारी करण्यात आले. या आंदोलनात कामगारांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.

ठळक मुद्देशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न वेतनासह अन्य समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी

कणकवली : एसटी कर्मचाऱ्यांचे दिवाळी सणापूर्वी दोन महिन्यांचे थकित वेतन मिळावे. तसेच महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी. अशा विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने आक्रोश आंदोलन सोमवारी करण्यात आले. या आंदोलनात कामगारांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.एसटी कामगार संघटनेचे प्रदेश सचिव दिलीप साटम, विभागीय अध्यक्ष सुरेंद्र मोरजकर, विभागीय सचिव विनय राणे, विभागीय खनिजदार अनिल नर, रवींद्र भिसे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.कोरोनाच्या आपत्ती काळात एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. तसेच सध्या मुंबई बेस्टची प्रवासी वाहतूकही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. त्यामध्ये बरेच कर्मचारी बाधित झालेले असून सुमारे ७४ कर्मचारी मृत झालेले आहेत.कोरोना कालावधीत कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानाही कामगारांना ऑगस्ट २०२० पासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व सण उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१९ पासून वाढीव ५ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे. परंतु एसटी कामगारांना तो अद्याप लागू केलेला नाही. त्याचप्रमाणे सन २०१८ ची वाढीव २ टक्क्यांची तीन महिन्यांची थकबाकी व सन २०१९ ची ३ टक्क्यांची नऊ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकीही एसटी कामगारांना अद्याप मिळालेली नाही. त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल लागू केलेली आहे. परंतु एसटी कामगारांना अद्यापपर्यंत ती लागू केलेली नाही.उपासमार थांबविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेतएसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचे वेतन नियत देय तारखेस देण्याची जबाबदारी कायद्याने एसटी प्रशासनाची असतानाही त्यांनी वेतन दिलेले नाही. त्यामुळे एसटी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची वेतनाविना होणारी उपासमार थांबविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. अशी मागणी एसटी कामगार संघटनेकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :state transportएसटीKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग