शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

एसटी कर्मचाऱ्यांची व्यवस्था लोकवस्तीपासून दूर करावी : राकेश कांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 20:14 IST

Coronavirus Unlock State Transport- मुंबईहून आलेल्या कुडाळ आगारातील वाहक आणि चालक यांना लोकवस्तीच्या ठिकाणी नवीन बसस्थानकाच्या इमारतीत क्वारंटाईन न करता लोकवस्तीपासून दूर प्रशस्त हॉलमध्ये ठेवावे, याकरिता कुडाळ भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक राकेश कांदे यांनी एसटीचे वाहतूक नियंत्रक यांचे लक्ष वेधले आहे. संबंधित गोष्टीची तातडीने दखल न घेतल्यास परिसरातील नागरिकांना घेऊन पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी दिला.

ठळक मुद्देएसटी कर्मचाऱ्यांची व्यवस्था लोकवस्तीपासून दूर करावी : राकेश कांदे पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवणार

कुडाळ : मुंबईहून आलेल्या कुडाळ आगारातील वाहक आणि चालक यांना लोकवस्तीच्या ठिकाणी नवीन बसस्थानकाच्या इमारतीत क्वारंटाईन न करता लोकवस्तीपासून दूर प्रशस्त हॉलमध्ये ठेवावे, याकरिता कुडाळ भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक राकेश कांदे यांनी एसटीचे वाहतूक नियंत्रक यांचे लक्ष वेधले आहे. संबंधित गोष्टीची तातडीने दखल न घेतल्यास परिसरातील नागरिकांना घेऊन पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी दिला.मुंबईत बेस्टमध्ये सेवा बजावून आलेले वाहक आणि चालक यांना कुडाळ एसटी प्रशासनाने नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीत क्वारंटाईन केले होते. लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकामध्ये अपुरी सोय असताना क्वारंटाईन करणे हे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याच्या दृष्टीने धोक्याचे होते. त्या कर्मचाऱ्यांना बसस्थानकाच्या वरच्या मजल्यावर बघताच कुडाळ शहरातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली.नगरसेवक राकेश कांदे यांनी कुडाळचे आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे आणि वाहतूक नियंत्रक रसाळ यांच्याशी यासंबंधी चर्चा केली. या कर्मचाऱ्यांना लोकवस्तीत न ठेवता लोकवस्तीपासून दूर प्रशस्त हॉलमध्ये व्यवस्था करावी अशी दूरध्वनीवरून चर्चा केली.मुख्याधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना नाहीकुडाळच्या नूतन बसस्थानक इमारतीमध्ये क्वारंटाईन केले असले तरीही जेवणासाठी चालक-वाहकांना एसटीमधून नवीन कुडाळ आगात यावे लागते. नवीन इमारतीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती. नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये क्वारंटाईन ठेवण्याआधी बसस्थानकाच्या यंत्रणेने कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. याबाबत नगरसेवक राकेश कांदे यांनी मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकsindhudurgसिंधुदुर्गstate transportएसटीkudal-acकुडाळ