शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सिंधुदुर्ग : विद्यापिठ अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्याना मिळणार एस टी पास सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 15:44 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना देण्यात येणाऱ्या बस प्रवास भाड्याच्या पास सवलत योजनेमध्ये महत्वाकांक्षी बदल करण्यात आला आहे़ या बदलानुसार १९८६ पूर्वीच्या व नंतर सुरू झालेल्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पास सवलत मिळणार आहे़.

ठळक मुद्देविद्यापिठ अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्याना मिळणार पास सवलतएस टी ची योजना : प्रकाश रसाळ यांची माहिती

कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना देण्यात येणाऱ्या बस प्रवास भाड्याच्या पास सवलत योजनेमध्ये महत्वाकांक्षी बदल करण्यात आला आहे़ या बदलानुसार १९८६ पूर्वीच्या व नंतर सुरू झालेल्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पास सवलत मिळणार आहे़. त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत विद्यार्थीनींना बारावीपर्यंत मोफत पास सेवा उपलब्ध झाली आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग एस टी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली़कणकवली येथील एस टी विभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अभिजित पाटील, कर्मचारी वर्ग अधिकारी एल.आर. गोसावी, दिलीप साटम, प्रकाश नेरूरकर, मोहनदास खराडे आदी अधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रकाश रसाळ म्हणाले, एसटीच्या विविध पास सवलतींमध्ये २७ सवलती काही सुधारणा करून ९ आॅक्टोबर २०१८ च्या परिपत्रकानुसार शासनाने जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थीनींना बारावीपर्यंत मोफत प्रवास, नव्याने १९८६ नंतर सुरू झालेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पास सवलत, तंत्र व व्यावसायीक पास सवलत, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त व्यक्तींना वातानुुकुली बस सेवा, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना ८ हजार किलोमिटरपर्यंत प्रवास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार लाभार्थींना ८ हजार किलोमिटर प्रवास १०० टक्के सवलत, स्वातंत्र्य सैनिकाना १०० टक्के सवलत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देऊन ४ हजार किलोमिटरपर्यंत ५० टक्के सवलत, क्षयरोग, कुष्ठ रोग, कर्करोग ७५ टक्केपर्यंत प्रवास भाड्यात सवलत देण्याचा निर्णय एस टी ने घेतल्याचे प्रकाश रसाळ यांनी सांगितले़सिकलसेल, हिमोफेलिया, एचआयव्ही बाधीत व डायलेसीस रूग्णांसाठी १०० टक्के पास सवलत, राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार प्राप्त व्यक्तींना १०० टक्के सवलत, ४० टक्के पेक्षा जास्त अंध व अपंग व्यक्तींसाठी ७५ टक्के सवलत, अंध व अपंग व्यक्तीं पैकी परावलंबी असणाऱ्या व्यक्तींच्या सोबत असलेल्या साथीदारास ५० टक्के सवलत, अधिस्विकृतीधारक पत्रकारास शिवशाही व सर्व एसटी बसेसमध्ये १०० टक्के सवलत, माजी आमदारांना १०० टक्के सवलत, शासन पुरस्कृत खेळामध्ये विजेते स्पर्धक ३३ टक्के सवलत, विद्यार्थी जेवनाचे डब्बे १०० टक्के सवलत, विद्यार्थ्यांना मोठ्या सुट्टी मुळ गावी जाणे, आजारी आई वडीलांना भेटणे, कॅम्पला जाणे ५० टक्के सवलत, विद्यार्थ्यांना नैमत्तिक करारावर सहल सवलत ५० टक्के, पंढरपुर, आषाढी, कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचा मान मिळालेल्या वारकरी दाम्पत्याला १०० टक्के सवलत मिळणार असल्याचे प्रकाश रसाळ यांनी सांगितले.रेस्क्यू होम मधील मुलांना वर्षातून एकदा ६६.६७ टक्के एवढी सहलीकरता सवलत, मुंबई पुर्नवसन केंद्रातील मानसीक दृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना ६६.६७ टक्के सवलत, अपंग गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना १०० टक्के सवलत, आदीवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार वर्षभर १०० टक्के प्रवास सवलत, कौशल्य सेतू अभियानांतर्गत माध्यमिक शालांत परिक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यााना १११ प्रशिक्षण केंद्रात ६ महिन्यांचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासात ६६.६७ टक्के सवलत सरकारने जाहीर केली आहे़ अशा २७ योजना प्रवास सवलतीच्या सिंधुदुर्गात राबविल्या जात आहेत. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपापल्या तालुका आगारामध्ये संपर्क साधून या सवलतींची अधिक माहिती करून घ्यावी व त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाश रसाळ यांनी केले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळsindhudurgसिंधुदुर्ग