शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे चुकवताना एसटी बस दगडाला धडकली, चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली; वैभववाडीत झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:44 IST

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ): तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामासाठी काढलेल्या पर्यायी मार्गावरील खड्डे चुकवताना एसटी बस रस्त्याच्या कडेला ...

वैभववाडी (सिंधुदुर्ग): तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामासाठी काढलेल्या पर्यायी मार्गावरील खड्डे चुकवताना एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला धडकली. हा अपघात बुधवारी पहाटे वैभववाडीतील सुकनदीच्या गणपती विसर्जन घाटाजवळ झाला. अपघातात एसटीच्या दर्शनीभागाचा चक्काचूर झाला आहे. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला.तळेरे-गगनबावडा रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील वैभववाडी-एडगाव दरम्यानच्या सुक नदीवरील पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यासाठी येथील वाहतूक सोनाळीतून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तहसिलदार नाका ते सोनाळी गावहद्दीपर्यंत मातीचा भरावं टाकून पर्यायी मार्ग बनविण्यात आला आहे. याच मार्गाने बुधवारी (दि.२६) पहाटे ४ वा धाराशिव-पणजी हिरकणी बस वैभववाडीच्या दिशेने येत होती. शुक नदीवरील विसर्जन घाटाजवळ गाडी आली असता, चिंचोळ्या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. ते खड्डे चुकवताना एसटी बस थेट रस्त्याकडे असलेल्या दगड व झाडाला जाऊन धडकली.त्याचवेळी चालकाने प्रसंगावधान दाखवविले त्यामुळे बसमधील प्रवासी बालंबाल बचावले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. अपघातात एसटीच्या दर्शनीभागाचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. एसटी बाजूला घेतल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत झाला.ठेकेदाराची बेफिकिरी लोकांच्या जीवावर बेतणारी!महामार्गाच्या ठेकेदाराने हा पर्यायी मार्ग बनवून दोन महिने झाले. फोंडाघाट बंद केल्यामुळे सध्या या मार्गावर वाहतूक दुप्पटीने वाढली आहे. परंतु, या पर्यायी मार्गानवर महिनाभरापासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यापुर्वीही या पर्यायी मार्गावर खड्ड्यांमुळे अनेकदा छोटेमोठे अपघात तसेच वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, या खड्ड्यांकडे संबंधित ठेकेदार, महामार्ग प्राधिकरण किंबहुना स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात