corona virus Malvan : ऑन दि स्पॉट कोरोना चाचण्याही होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:11 IST2021-05-10T18:09:21+5:302021-05-10T18:11:58+5:30
corona virus sindhudurg : कोरोना विषाणू साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तरी ९ मे रोजी रात्री १२ ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत मेडिकल एमर्जन्सी व्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा दाखल केला जाईल. बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या ऑन दी स्पॉट कोरोना टेस्ट करण्यासाठी फिरते वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.

corona virus Malvan : ऑन दि स्पॉट कोरोना चाचण्याही होणार
मालवण : कोरोना विषाणू साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तरी ९ मे रोजी रात्री १२ ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत मेडिकल एमर्जन्सी व्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा दाखल केला जाईल. बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या ऑन दी स्पॉट कोरोना टेस्ट करण्यासाठी फिरते वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या आदेशानुसार ज्या सेवा संबंधित व्यावसायिकांनी घरपोच द्यावयाच्या आहेत त्यांनीही नियमांचे व वेळेचे पालन करावे, असेही आवाहन तहसीलदार यांनी केले.
ज्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची आहे. त्यांना लसीकरण केंद्रावर जाण्यास सवलत राहील, अशी माहितीही तहसीलदार पाटणे यांनी दिली आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन प्रत्येकाने करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.