शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीत कणकवली तालुक्यातील काही मतदार मतदानापासून वंचित, भाजपा शिष्टमंडळाने वेधले लक्ष

By सुधीर राणे | Updated: May 11, 2024 13:24 IST

कणकवली: लोकसभा निवडणुकीत कणकवली तालुक्यातील काही मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. त्यांना   मतदान करता यावे यासाठी यंत्रणा राबवावी, ...

कणकवली: लोकसभा निवडणुकीत कणकवली तालुक्यातील काही मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. त्यांना  मतदान करता यावे यासाठी यंत्रणा राबवावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, कणकवली तालुक्यातील प्रशासनाच्यावतीने नेमण्यात आलेल्या खासगी भाड्याच्या गाड्यांवरील चालक आपल्या निवडणूक ड्युटीवर असल्याने त्यांची पर्यायी व्यवस्था मतदानासाठी झाली नाही. त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. निवडणूक विभागाच्यावतीने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यासाठी शासनाने विविध कार्यक्रम देखील घेतले होते. असे असताना देखील कणकवली तालुक्यातील आपल्या निवडणूक विभागाच्या संबधित असलेल्या भाड्यांच्या गाड्यांवरील चालक मतदानापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांना मतदान करण्यासाठी यंत्रणा राबवावी.यावेळी भाजपच्यावतीने निवेदन देताना  शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री, स्वप्निल चिंदरकर, निखिल आचरेकर, समीर प्रभूगावकर, अभय गावकर आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानBJPभाजपा