शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चिपी विमानतळाच्या काही परवानग्या बाकी, सुरेश प्रभूंची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 09:33 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ लवकरच सुरू होईल. मात्र त्याच्या काही परवानग्या घेणे बाकी आहे.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ लवकरच सुरू होईल. मात्र त्याच्या काही परवानग्या घेणे बाकी आहे. अद्याप केंद्रीय गृहखात्यांची परवानगी मिळणे बाकी असल्याची कबुली केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी दिली. या परवानग्या विमानतळ बांधणा-या कंपनीने घेणे आवश्यक होते. ते काम आता मलाच करावे लागत आहे. या परवानग्या लवकर घेतल्या जात असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी आणि रत्नागिरी विमानतळाचा समावेश उड्डाण तीनमध्ये करण्यात आला असल्याचे यावेळी मंत्री प्रभू यांनी स्पष्ट केले.कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या रेल टेल हॉटेलच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री प्रभू म्हणाले, जगात अर्थव्यवस्थेचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे आता निरनिराळ्या  नोक-या उपलब्ध होत आहेत. ‘स्टार्टअप इंडिया’सारखे नवनवीन प्रकल्प येत आहेत. त्यातूनही रोजगाराच्या संधी येत आहेत. पूर्वी रोजगाराबाबत वेगळे समीकरण होते. पण आता हे समीकरण बदलले आहे. पर्यटन तसेच सेवाक्षेत्र या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार येत आहेत. हे बदलते स्वरूप आहेत. ते आता सर्वांनी स्वीकारले पाहिजे. हे स्वरूप भारतातच नाही, तर जगात बदलले आहे, असेही मंत्री प्रभू यांनी सांगितले.सिंधुदुर्गमधील चिपी व रत्नागिरी विमानतळाचा समावेश हा उड्डाण तीनमध्ये करण्यात आला आहे. उड्डाण तीनचा शुभारंभ ८ फेबु्रवारीला होणार आहे. यावेळी या दोन विमानतळांसाठी विमान कंपन्यांची बोली लागेल आणि नंतरच हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होईल. मात्र चिपी विमानतळाच्या काही परवानग्या येणे बाकी आहेत. गृहविभागाची परवानगी अद्याप मिळाली नाही. ती घेण्याचे काम विमानतळ तयार करणाºया कंपनीचे होते, पण तेही काम आता मलाच करावे लागत आहे. तेही काम करू आणि लवकरात लवकर हे विमानतळ सुरू केले जाईल, असे यावेळी मंत्री प्रभू यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळSuresh Prabhuसुरेश प्रभू