शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी नदीपात्रात कोसळून एक ठार

By admin | Updated: July 21, 2015 00:54 IST

हिरण्यकेशीजवळ अपघात

आंबोली : आंबोली-हिरण्यकेशी या तीर्थक्षेत्रावरून पूजा करून परतत असताना गावठणवाडी येथील हनुमंत शिवराम मोहिते (वय ५२) दुचाकीसह पन्नास फूट खोल नदीपात्रात कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अतिवृष्टीने खचलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. या प्रकारामुळे आंबोलीतील निकृष्ट रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐंरणीवर आला आहे. आंबोली आणि परिसरात बांधकाम विभागाच्या बेपर्वाईमुळे आतापर्यंत चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. हनुमंत मोहिते हे दर सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हिरण्यकेशी येथील महादेवाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात होते. सोमवारी ते पूजा आटोपून साडेसात वाजण्याच्या सुमारास परतत असताना अतिवृष्टीमुळे खचलेल्या रस्त्याचा धुक्यामुळे अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी सुमारे पन्नास फू ट खोल नदीत कोसळली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच मृत झाले. त्यांच्या पत्नीने आपले पती नऊ वाजले तरी परत आले नसल्याचे पुतण्यांना सांगताच पुतण्यांनी शोधाशोध केली असता त्यांना मोहिते यांचा मृतदेह आढळून आला. मोहिते यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजेंद्र भिसे, कॉन्स्टेबल नितीन उमरसकर करीत असून, अपघाताची माहिती दशरथ मोहिते यांनी पोलिसांना दिली. (वार्ताहर) हलगर्जीपणाचा चौथा बळी कावळेशेत येथे पाईपला जाळी बसविण्याची मागणी करूनही जाळी न बसविल्याने यापूर्वी दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुहास नाईक यांचा कठडा नसलेल्या पुलावरून रिक्षा नदीत कोसळून मृत्यू झाला होता. सोमवारी पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊन हनुमंत मोहिते यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे ग्रामस्थांनी बांधकाम विभागावर आपला संताप व्यक्त करीत आहेत.