"...तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरच्या घोषणा आणखी वाढतील", दीपक केसरकरांनी विरोधकांना डिवचले
By अनंत खं.जाधव | Updated: August 19, 2022 16:26 IST2022-08-19T16:26:05+5:302022-08-19T16:26:58+5:30
Deepak Kesarkar: ठाकरे गटाचा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले तर विधानभवनाच्या पायऱ्यावरच्या घोषणा आणखी वाढतील अशी कोपरखळी विरोधकांना मारत लवकरच या घोषणांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला.

"...तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरच्या घोषणा आणखी वाढतील", दीपक केसरकरांनी विरोधकांना डिवचले
- अनंत जाधव
सावंतवाडी : ठाकरे गटाचा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले तर विधानभवनाच्या पायऱ्यावरच्या घोषणा आणखी वाढतील अशी कोपरखळी विरोधकांना मारत लवकरच या घोषणांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला ते सावंतवाडीत बोलत होते यावेळी त्यांनी केंद्राचे शैक्षणिक धोरण राज्यातही लागू करणार असल्याचेही स्पष्ट केले.सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले,विद्याधर परब बंटी पुरोहित,दिलीप भालेकर,सत्यवान बांदेकर आदि उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, राज्यात अडीच वर्षांपूर्वी मागच्या दरवाजाने महाविकास आघाडी सरकार आले. त्यामुळे ते जास्त दिवस टिकले नाही आता खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा सरकार आलेले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकासाचा रथ सर्वांना मिळून पुढे घेऊन जायचं आहे.
माझ्याकडे असलेले शालेय शिक्षण खाते हे राज्यातील प्रमुख खाते आहे.त्यामुळे मला जास्ती जास्त काम करावे लागते त्यातून स्थानिकांशी सर्पक ही कमी प्रमाणात राहात असतो असे असले विकास कामे थांबणार नाही याची जबाबदारी मी घेतली आहे.लवकरच राज्यात केंद्राचे शैक्षणिक धोरण राबवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात ही करण्यात आली आहे.असे मंत्री केसरकर म्हणाले.
आपल्या संपर्कात ठाकरे गटातील आमदार असल्याची चर्चा सध्या आहे का असे विचारता त्यांनी मात्र त्यावर बोलण्याचे टाळत मी असे म्हटले तर असा टोला विरोधकांना लगावला ह्या घोषणांवर लवकरच सडेतोड उत्तर दिले जाणार असून त्यानंतर कधीच घोषणा होणार नाहीत असा इशाराही मंत्री केसरकर यांनी दिला.
परब यांच्या पाठीशी माझे आशीर्वादच राहतील
माझे वय आता आशीर्वाद देण्याचे आहे मात्र मी कामाचा व्याप कुठेही कमी केला नाही असे म्हणत मंत्री केसरकर यांनी संजू परब यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांच्या पाठीशी माझे कायम आशीर्वाद राहतील असे सांगितले.