मुस्कटदाबी होणाऱ्यांनी भाजपात याव

By Admin | Updated: November 7, 2014 23:39 IST2014-11-07T21:50:59+5:302014-11-07T23:39:04+5:30

राजन तेली यांचा काँग्रेसला टोलो

The smiling people should come to the BJP | मुस्कटदाबी होणाऱ्यांनी भाजपात याव

मुस्कटदाबी होणाऱ्यांनी भाजपात याव

सावंतवाडी : यापुढे कोणाला घाबरण्याचे कारण नाही. सर्वांनी भाजपमध्ये बिनधास्त या. केंद्रात व राज्यात भाजपचीच सत्ता आहे. ज्यांची पक्षात मुस्कटदाबी होत आहे त्यांचे आम्ही स्वागतच करू, असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी काँॅग्रेसला लगावला. ते सावंतवाडीतील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी मनोज नाईक, प्रशांत पांगम, अमित परब, राजू गावडे, आनंद नेवगी, उदय पारिपत्ये आदी उपस्थित होते. यावेळी तेली म्हणाले, सध्या भाजपमध्ये येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. यावेळी प्रवेश देताना जिल्हापातळीवरील व राज्य पातळीवरील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाणार आहे. कोणाला पक्षात यायचे असल्यास त्यांनी बिनधास्त पक्षात यावे. त्यांचा सन्मानच होईल. अनेकजणांना नेतेच कंटाळले आहेत त्यामुळे त्यांनी आमच्याकडे यावे, असा टोलाही काँग्रेसला हाणला.
विजयदुर्ग बंदराबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गंभीर असून विकासाची गंगा येण्यासाठी त्यांनी सर्व मदत करण्याचे जाहीर केले आहे. याबाबत लवकरच ते बैठकही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणात पंतप्रधान ग्रामसडक योजना राबवण्यासाठी निष्कर्ष बदलले जावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. याबाबतची मागणी मंत्री गडकरींकडे केल्याचेही त्यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The smiling people should come to the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.