शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांसह सहाजण जखमी

By admin | Updated: December 30, 2014 23:28 IST

कणकवलीत स्वीफ्ट डिझायर-एस.टी. अपघात

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर रामेश्वर प्लाझासमोर कनेडीहून कणकवलीकडे येणारी एसटी व वागदेच्या दिशेने जाणाऱ्या स्वीफ्ट डिझायरमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात नगराध्यक्षांसह सहाजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३५ वाजण्याच्या सुमारास घडली.काही कामानिमित्त नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत आपल्या कुटुंबीयांसोबत स्वीफ्ट डिझायर (क्र.एमएच ११, एके-३५९५) मधून मुंबई येथे गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्या कणकवली येथे दाखल झाल्या. कारचालक अविनाश जानबा गावकर (वय ४७, रा. वागदे) याला त्याच्या घरी सोडण्यासाठी जात असताना रामेश्वर प्लाझासमोर एसटी व स्वीफ्ट डिझायरमध्ये धडक होऊन अपघात झाला.कनेडीवरून कणकवलीच्या दिशेने बालाजी सूर्यकांत मुंडे (वय २८) हे एसटी क्र. (एमएच २०, डी-८४२३) घेऊन येत होते. याचवेळी अविनाश गावकर खोत कुटुंबियांसह वागदेच्या दिशेने स्वीफ्ट डिझायर घेऊन निघाला होता. यावेळी दोन्ही गाड्यांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामुळे झालेल्या अपघातात नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, त्यांचे पती यशवंत उर्फ बंडु खोत, मुलगी ऋता, रेखा, तसेच कारचालक अविनाश गावकर हे जखमी झाले. तसेच एसटी चालक बालाजी मुंडे हेही जखमी झाले आहेत. तर एसटीबरोबरच कारचेही नुकसान झाले आहे. हा अपघात अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही वाहनचालक तसेच नागरिकांनी तातडीने जखमींना येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातातील काही जखमींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले तर काही जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबतची माहिती पोलीस स्थानकात एसटी चालक बालाजी मुंडे यांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)