शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत अपक्षांकडून राणे, केसरकरांना धक्का, लक्षवेधी लढतींमध्ये मारली बाजी, बडे राणे समर्थक पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:40 IST

Sindhudurg Zilha Parishad Election Result: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला बंडखोर आणि अपक्षांनी जोरदार धक्का दिल्याचे आतापर्यंतच्या कलांमधून दिसत आहेत.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला बंडखोर आणि अपक्षांनी जोरदार धक्का दिल्याचे आतापर्यंतच्या कलांमधून दिसत आहेत. त्यात संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या कोलगाव आणि माडखोल जिल्हा परिषद गटांमध्ये अपक्ष उमेदवारांनी भाजपाच्या अधिकृत उमेदवारांना पराभूत करत बाजी मारली आहे. कोलगावमधून अपक्ष उमेदवार मायकेल डिसोझा यांनी विजय मिळवला आहे. तर माडखोलमध्ये अपक्ष उमेदवार शिवानी संजय नाईक या विजयी झाल्या आहे.

एकेकाळी राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निवडणुकीसाठी भाजपा आणि शिंदेसेनेने महायुती केली होती. मात्र या महायुतीला अनेक ठिकाणी बंडखोर आणि अपक्षांनी आव्हान दिल्याचं चित्र दिसत होतं. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव जिल्हा परिषद गटात राणे समर्थक असलेले भाजपाचे स्थानिक नेते महेश सारंग विरुद्ध अपक्ष मायकेल डिसोझा यांच्यात लढत झाली होती. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत अपक्ष मायकेल डिसोझा यांनी बाजी मारली. 

तर माडखोल जिल्हा परिषद गटामध्येही अपक्षांनी प्रस्थापित नेत्यांना पराभवाचा धक्का दिला आहे. येथे तीनही जागांवर अपक्षांनी बाजी मारली. माडखोल जिल्हा परिषद गटामध्ये अपक्ष उमेदवार शिवानी नाईक यांनी विजय मिळवला. तर माडखोल पंचायत समिती गणामध्ये अपक्ष अवनी राऊळ यांनी बाजी मारली आहे. तर कलंबिस्त पंचायत समिती गणामध्ये अपक्ष  उमेदवार प्रथमेश सावंत हे विजयी झाले आहेत.

या दोन मतदारसंघांसोबतच सावंतवातील तळवडे जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाचे संदीप गावडे आणि उद्धवसेनेचे रूपेश राऊळ यांच्यात मुख्य लढत झाली होती. या लढतीत संदीप गावडे यांनी विजय मिळवला आहे.    

English
हिंदी सारांश
Web Title : Independents Upset Rane, Kesarkar in Sawantwadi Local Elections

Web Summary : In Sawantwadi, independents dealt a blow to the BJP-Shinde Sena alliance, winning key Zilla Parishad seats like Kolgaon and Madkhol. Rane supporters lost, while BJP's Sandeep Gawde won in Talavade. The results highlight the challenge posed by rebel candidates.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीBJPभाजपाShiv Senaशिवसेना