शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

सिंधुदुर्ग : कणकवलीत मुक्त विद्यापीठाचा युवक महोत्सव :  दादासाहेब मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 5:23 PM

कोल्हापूर विभागाच्या १६ व्या युवक महोत्सवाचे यजमानपद कणकवली महाविद्यालयाला देण्यात आले आहे. हा युवक महोत्सव २१ आॅक्टोबरला होणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक दादासाहेब मोरे यांनी दिली.

ठळक मुद्देरत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर चार जिल्ह्यांचा समावेश २१ आॅक्टोबरला उद्घाटन

कणकवली : कोकण हे कलेचे माहेरघर आहे. विविध सांस्कृतिक कलांमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व असते. त्यामुळे आगामी इंद्रधनुष्य महोत्सवात मोठ्या प्रमाणात कोकणातील विद्यार्थ्यांचा समावेश असावा यासाठी कोल्हापूर विभागाच्या १६ व्या युवक महोत्सवाचे यजमानपद कणकवली महाविद्यालयाला देण्यात आले आहे. हा युवक महोत्सव २१ आॅक्टोबरला होणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक दादासाहेब मोरे यांनी दिली.कणकवली शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे, मुक्त विद्यापीठ केंद्र संयोजक विजय सावंत, सहसंयोजक प्रवीण सावंत, युवक महोत्सवाचे समन्वयक प्रा. हरिभाऊ भिसे, वेंगुर्ले केंद्रप्रमुख तुषार वेंगुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.दादासाहेब मोरे पुढे म्हणाले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र कोल्हापूरअंतर्गत हा १६ वा युवक महोत्सव होत आहे. मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अध्ययन करताना आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ हा महोत्सव ठरणार आहे. अनेक कलाकार या कोकणात घडलेले आहेत. कलेच्या माध्यमातून राज्यस्तरापर्यंत आपली कला सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना या महोत्सवामुळे मिळते.या महोत्सवाचे उद्घाटन कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी. डी. कामत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्ष भाईसाहेब खोत, सचिव विजयकुमार वळंजू, प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धेत एकांकिका, मूक अभिनय, प्रहसिका, लघुनाटिका, नकला, शास्त्रीय तालवाद्य, सूरवाद्य, शास्त्रीय गायन, उपशास्त्रीय गायन, भारतीय सुगम गायन, समूहगीत, पाश्चिमात्य समूहगीत, लोकसंगीत, वाद्यवृंद्य, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व व वादविवाद, काव्यवाचन, चित्रकला, स्थळचित्रण, कोलाज, व्यंगचित्र, रांगोळी, फोटोग्राफी आणि रचना यांसह अन्य विविध कला या युवा महोत्सवात सादर केल्या जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा २५ वर्षे असावी लागणार आहे.विजेत्या विद्यार्थ्यांना विभागातून नाशिक विद्यापीठ येथे होणाऱ्या केंद्रीय युवक महोत्सवात सहभाग मिळणार आहे. तसेच त्या विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण मोफत केले जाणार आहे. मुक्त विद्यापीठ नाशिकने तृतीयपंथी व कैद्यांना मोफत शिक्षण देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. कोल्हापुरात चालूवर्षी ३५० कैद्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. या स्पर्धा नि:पक्षपाती घेतल्या जाणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठsindhudurgसिंधुदुर्ग