शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

सिंधुदुर्ग : राणे स्वाभिमान मिळविणार की भाजपचे कमळ फुलणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 3:08 PM

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवार १२ एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपाच्या कोट्यातून राज्यसभा खासदार झालेले नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि भाजप-शिवसेना युतीमध्ये ही याठिकाणी लढत होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीतील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे.

ठळक मुद्देराणे स्वाभिमान मिळविणार की भाजपचे कमळ फुलणार ?संपूर्ण राज्याचे लक्ष : कणकवली नगरपंचायतीचा गुरूवारी निकाल

महेश सरनाईक 

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवार १२ एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपाच्या कोट्यातून राज्यसभा खासदार झालेले नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि भाजप-शिवसेना युतीमध्ये ही याठिकाणी लढत होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीतील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे.नारायण राणे हे भाजपाचे खासदार आहेत असे असताना राणे यांनी कणकवलीत भाजपा विरोधातच दंड थोपटले आहेत. त्यामुळे राणे यांचा विजय होतो की भाजपाचा हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूक ही सिंधुदुर्गच्या राजकारणाची दिशा ठरविणारी असते. नारायण राणे यांना विरोध म्हणून शिवसेनेने येथे भाजपाशी युती केली आहे.नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी भाजप शिवसेना युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे संदेश पारकर हे माजी नगराध्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत. तर स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्याने या आघाडीचे समीर नलावडे हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. गाव विकास आघाडीतर्फे राकेश राणे आणि काँग्रेसतर्फे विलास कोरगावकर हे अन्य दोन उमेदवार रिंगणात असल्याने नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होत आहे.कणकवली नगरपंचायतीच्या १६ आणि नगराध्यक्ष पदासाठी ६ एप्रिलला मतदान झाले. तर प्रभाग १0 मध्ये बुधवार ११ एप्रिलला मतदान होत आहे. त्यानंतर गुरूवारी १२ एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असून त्याची तयारी देखील केली आहे. त्यामुळे कणकवलीचा नगराध्यक्ष कोण होणार? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.अनोख्या निवडणुकीची राज्यभर चर्चानारायण राणे भाजपातर्फे राज्यसभेवर खासदार आहेत. नारायण राणेंचे सुपूत्र नीतेश राणे काँग्रेसचे आमदार आहेत. असे असताना राणे किवा नीतेश यांना त्यांच्या स्वाभिमान पक्षासाठी मतदान करा, असे जाहीर आवाहन करता येत नव्हते.

राणे आणि नीतेश या दोघांनीही स्वाभिमान पक्षासाठी काम केले. मात्र, त्यांनी या निवडणुकीत कुठल्याच पक्षाचा उल्लेख न करता केवळ उमेदवारांना टार्गेट केले. तर दुसरीकडे राज्यभरात एकमेंकावर दररोज चिखलफेक करणारे राज्यातील सत्ताधारी शिवसेना-भाजप येथे एकत्र लढले. त्यामुळे कणकवलीच्या या अनोख्या निवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग