शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सिंधुदुर्ग : मच्छिमारांना डिझेल परतावा लवकर द्यावा :वैभव नाईक यांची मंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:30 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांचा शासनाकडे प्रलंबित असलेला ३ कोटी ४२ लाख ७० हजार २६७ रूपयेचा डिझेल परतावा लवकरात लवकर मच्छिमार संस्थांना देण्यात यावा, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देमच्छिमारांना डिझेल परतावा लवकर द्यावावैभव नाईक यांची मागणी : मत्स्यविकास मंत्र्यांना निवेदन

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांचा शासनाकडे प्रलंबित असलेला ३ कोटी ४२ लाख ७० हजार २६७ रूपयेचा डिझेल परतावा लवकरात लवकर मच्छिमार संस्थांना देण्यात यावा, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. त्यावर मंत्री जानकर यांनी सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर निधीची तरतूद करून ही रक्कम देण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.|सिंधुदुर्ग जिल्हा हा एका बाजूने संपूर्णत: समुद्र किनारपट्टी लाभलेला जिल्हा आहे. या किनारपट्टी शेजारील गावे मोठ्या प्रमाणात मच्छिमारी व्यवसाय करत आहेत. मच्छिमारी व्यवसायावरच या भागातील स्थानिक कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे. अशा मच्छिमारी करणाऱ्या अनेक संस्था सिंधुदुर्गात असून मच्छिमारी व्यवसाय करीत आहेत.मात्र, शासनाकडून देय असलेला या संस्थांचा डिझेल परतावा शासन दरबारी प्रलंबित असल्याने याचा मोठ्या प्रमाणावर या संस्थांना फटका बसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात अशा ६ संस्था देवगड तालुक्यात ३ संस्था वेंगुर्लेत १ संस्था आहेत.या संस्थांची मिळून ३ कोटी ४२ लाख ७० हजार २६७ रुपये एवढी रक्कम शासनाकडे डिझेल परताव्या स्वरूपात थकबाकी आहे. या संस्थांच्या बोट मालकांना मोठ्या प्रमाणात देणी देय असल्याने संस्था आर्थिक डबघाईस आल्या आहेत.तरी या मच्छिमारी संस्थांचा दैनंदिन मच्छिमारी व्यवसाय चालण्यासाठी शासन स्तरावर प्रलंबित असलेली १० संस्थांची मार्च २०१८ अखेर पर्यंतची डिझेल परताव्याची रक्कम लवकरात लवकर निधीची तरतूद करून संस्थांना वर्ग करण्यात यावी. तसे आदेश मत्स्यविकास विभागात देण्यात यावेत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली आहे.गतवर्षी पावणेचार कोटींचा परतावागतवर्षीही मच्छिमार संस्थांचा प्रलंबित डिझेल परतावा मिळण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यव्यवसाय विकासमंत्री महादेव जानकर यांच्याकडे निवेदन देऊन प्रयत्न केले होते. नाईक यांच्या मागणीनुसार गतवर्षी शासनाकडून ३ कोटी ७३ लाख ९२ हजार ७00 रूपये निधीची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून मच्छिमार संस्थांचा डिझेल परतावा देण्यात आला होता. 

टॅग्स :fishermanमच्छीमारVaibhav Naikवैभव नाईक Mahadev Jankarमहादेव जानकरsindhudurgसिंधुदुर्ग