शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आम्ही वैभववाडीकर आयोजित कलाकारांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 15:00 IST

वैभववाडी तालुका विकासात पुढे कसा जाईल यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन करीत स्थानिक कलाकारांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आम्ही वैभववाडीकरच्या माध्यमातून केलेला प्रयत्न स्तुत्य आहे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले.

ठळक मुद्देआम्ही वैभववाडीकर आयोजित कलाकारांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद विकासासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक : नीतेश राणे

वैभववाडी : वैभववाडी तालुका विकासात पुढे कसा जाईल यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन करीत स्थानिक कलाकारांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आम्ही वैभववाडीकरच्या माध्यमातून केलेला प्रयत्न स्तुत्य आहे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले.आम्ही वैभववाडीकर आयोजित महाराष्ट्राची संस्कृती हा कार्यक्रम येथील पृथ्वीराज पॅलेसच्या रंगमंचावर झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, नगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, नगराध्यक्ष संजय चव्हाण, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, उपनगराध्यक्षा संपदा राणे, बांधकाम सभापती समिता कुडाळकर, स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, मुंबईचे माजी नगरसेवक अजित रावराणे, उद्योजक विकास काटे, बाप्पी मांजरेकर, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मनोज सावंत, नगरसेविक रवींद्र तांबे, अक्षता जैतापकर, सुनील रावराणे, आम्ही वैभववाडीकर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन समितीचे अध्यक्ष महेश रावराणे, मंगेश कदम, संतोष टक्के, रणजित तावडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक महेश रावराणे यांनी केले तर सूत्रसंचालन संजीवनी पाटील व संतोष टक्के यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश कदम, संतोष टक्के, संजय लोके, महेश रावराणे, विद्याधर सावंत, अंकुश जाधव, मुकुंद रावराणे, सचिन सावंत, सुधाकर रावराणे, उज्ज्वल नारकर, ओंकार कदम, संजीवनी पाटील, निलोफर शेख, शितल पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.सांस्कृतिक परंपरेचे दर्शनस्थानिक कलाकारांनी मराठमोळ्या वेशभूषेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. यामध्ये कोळीगीत, वारकरी दिंडी, गोंधळ, मंगळागौर, भजन, झिम्मा फुगडी, आदिवासी नृत्य यांसारखे बहारदार कार्यक्रम सादर केले. तसेच शिवचरित्ररुपी नाटिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या बालपणापासून संभाजी राजेंच्या वधापर्यंतचा संपूर्ण ऐतिहासिक कालखंड हुबेहूब साकारला. ही ऐतिहासिक नाटिका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग