सिंधुदुर्ग : सुंदरवाडी महोत्सवात चित्र, शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन, कलेत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 06:09 PM2018-02-26T18:09:45+5:302018-02-26T18:09:45+5:30

कलेच्या क्षेत्रात सिंधुदुर्गच्या कलाकारांनी जागतिक क्षेत्रात नाव कमावले आहे. कलेची ही परंपरा सतत सुरू ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे. त्यासाठी मी कलाकारांना ताकद देण्याचे काम करेन, असे उद्गार आमदार नीतेश राणे यांनी काढले.

Sindhudurg: Opening of picture, sculpture exhibition at Sunderwadi festival, brighten the name of Kalat district: Nitesh Rane | सिंधुदुर्ग : सुंदरवाडी महोत्सवात चित्र, शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन, कलेत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा : नीतेश राणे

चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी एस. बी. पोलाजी, रवींद्र मडगावकर, अशोक सावंत, संजू परब, प्रमोद सावंत, सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देकलेत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा : नीतेश राणेसुंदरवाडी महोत्सवात चित्र, शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन

सावंतवाडी : कलेच्या क्षेत्रात सिंधुदुर्गच्या कलाकारांनी जागतिक क्षेत्रात नाव कमावले आहे. कलेची ही परंपरा सतत सुरू ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे. त्यासाठी मी कलाकारांना ताकद देण्याचे काम करेन, असे उद्गार आमदार नीतेश राणे यांनी काढले.

श्री स्वामी समर्थ जीवन विकास संस्था, मुंबई (वाफोली) यांच्यावतीने शिवरामराजे आर्ट गॅलरी येथे सुंदरवाडी महोत्सवाच्या निमित्ताने चित्र व शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार राणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार एस. बी. पोलाजी, स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते संदीप कुडतरकर, पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर, अशोक सावंत, संजू परब, केतन आजगावकर, राजू बेग, सतीश पाटणकर, दत्तप्रसाद पाटणकर, विशाल परब, परिमल नाईक, दिलीप भालेकर, गुरूनाथ पेडणेकर, प्रमोद सावंत, आनंद शिरवलकर, दीपाली भालेकर, सुधीर आडिवरेकर, निकिता सावंत, उत्तम पांढरे, समृद्धी विरनोडकर, अन्वर खान, गुरू मठकर, प्रियांका गावडे आदी उपस्थित होते.

प्रदर्शनात पोलाजी यांची पेंटिग्ज, शिल्पकला तसेच चित्रकार व मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर, यश चोडणकर, सिद्धेश धुरी, बलराम सामंत, विनिता पांजरी, तन्मेश परब, संयुक्ता कुडतरकर, रोहित वरेरकर, आयुष पाटणकर, अर्चित परब व राज वीर यांची चित्रे आहेत.

प्रदर्शनाचे कौतुक

आमदार नीतेश राणे यांनी महोत्सवातील चित्र प्रदर्शनाची पाहणी करीत कौतुक केले. तसेच चित्रकार पोलाजी यांनी इथल्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू ठेवावे, असे आवाहन केले. स्वागत व प्रास्ताविक पोलाजी यांनी केले.

Web Title: Sindhudurg: Opening of picture, sculpture exhibition at Sunderwadi festival, brighten the name of Kalat district: Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.