शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

सिंधुदुर्ग: चाकरमानी निघाले परतीच्या मार्गावर, कोकणातील सर्व रेल्वे गाड्या फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 14:55 IST

सिंधुदुर्गात आलेले मुंबईकर चाकरमानी परतीच्या मार्गावर असून, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच्या सर्व गाड्या रेल्वे प्रवाशांनी भरून जात आहेत. रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसत आहे.

ठळक मुद्देचाकरमानी निघाले परतीच्या मार्गावर, कोकणातील सर्व रेल्वे गाड्या फुल्ल  सुटीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात; आरक्षणासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दी

कणकवली : सिंधुदुर्गात आलेले मुंबईकर चाकरमानी परतीच्या मार्गावर असून, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच्या सर्व गाड्या रेल्वे प्रवाशांनी भरून जात आहेत. रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसत आहे.

सुटीचे दिवस संपत आल्याने व शाळा सुरू होण्यास काही दिवस राहिल्याने मुंबईकर चाकरमानी मुंबईकडे रवाना होत आहेत. तसेच पुढील प्रवासाची तिकीटे काढण्यासाठी रेल्वे स्थानकात गर्दी वाढत आहे.सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानकांचा विचार करता सावंतवाडी रेल्वे स्थानकासह कुडाळ, कणकवली, वैभववाडी आदी रेल्वे स्थानकांवर मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. आरक्षण फुल्ल झाल्याने जनरल डब्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

अक्षरश: चेंगराचेंगरी होत आहे. सायंकाळी मडगाववरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या  कोकणकन्या गाडीचा प्रवास तर जीवघेणा म्हणावा लागेल. रत्नागिरी, खेड, चिपळूणमध्ये तर या गाडीच्या जनरल डब्यात पाय ठेवायला सध्या जागा मिळत नाही. कारण ही गाडी वेळेत मुंबईला पोहोचते.

वेळ अचूक असल्याने तसेच मुंबईच्या दिशेने जाण्याची वेळ योग्यप्रकारे असल्याने मुंबईकर चाकरमानी या गाडीला पसंती देतात. गोव्यावरून ही गाडी सुटते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा जास्त लोंढा या गाडीतच असतो.कोकणकन्यासारखीच योग्य वेळेत पोहोचणारी गाडी कोकण रेल्वे प्रशासनाने सोडणे गरजेचे आहे. तरच यावर काहीतरी उपाय होईल. सध्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्पे्रस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्पे्रस या चाकरमान्यांनी तुडुंब भरून मुंबईच्या दिशेने जातात.कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना, इमर्जन्सी फोन सुविधा सुरू केली आहे. आपत्कालीन कक्ष सुरू केले आहेत. पण रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर उपाययोजना आखणे गरजेचे आहे.कोकण रेल्वेच्या कुठल्याही गाडीचे उत्सव कालावधीतील तिकीट काढायचे म्हटल्यास वेटींग लिस्टमध्येच मिळते. तीन महिने अगोदर रेल्वेचे आरक्षण फुल्ल असते. त्यामुळे ज्या प्रवाशांना आरक्षण तिकीट मिळत नाही, त्यांना जनरल डब्याचाच आश्रय घेऊन प्रवास करावा लागतो.त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासन कोकणकन्यासारखी पर्यायी गाडी सोडण्याच्या विचारात आहे.त्यामुळे या कोकणकन्या गाडीतील गर्दी कमी होऊ शकते. त्यामुळे यावर लवकर उपाययोजना केल्यास या गाडीतून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल कमी होतील. त्याचप्रमाणे दादर-सावंतवाडी गाडीतही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यातील प्रवासी वर्ग प्रवास करताना हैराण होतो.

दिवाळी हंगाम असो किंवा मे महिना असो किंवा गणपती उत्सव असो, कोणत्याही सिझनमध्ये या गाड्यांतून प्रवास केल्यास गर्दी अफाटच असते. या कालावधीमध्ये प्रवाशांना गर्दीने प्रवास करावा लागतो. त्यामुळे यावर उपायोजना करणे कोकण रेल्वे प्रशासनासाठी गरजेचे बनले आहे.सुखकर प्रवास द्यासध्या कोकण रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवास देता यावा, रेल्वे स्थानकावर चांगल्या सुविधा देता याव्यात, त्याचप्रमाणे बचतगट स्टॉल कोकणातील उत्पादनाला प्राधान्य देणे या दृष्टीने उपाययोजना आखताना दिसते. याचा फायदा कोकणवासीयांना होईलच. पण वाढत्या रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवास देण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग