शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : भाजप संघटना वाढीसाठी जिल्हाव्यापी बुथनिहाय दौरा : बाबा मोंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 11:38 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आठही तालुकाध्यक्षांना सोबत घेऊन  २६ सप्टेंबरपासून वैभववाडी येथून जिल्हाव्यापी बुथनिहाय दौऱ्याला सुरुवात केली जाईल, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.

ठळक मुद्देभाजप संघटना वाढीसाठी जिल्हाव्यापी बुथनिहाय दौरा : बाबा मोंडकर वैभववाडीतून २६ सप्टेंबरला दौऱ्याला सुरूवात करणार

सिंधुदुर्ग : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आठही तालुकाध्यक्षांना सोबत घेऊन  २६ सप्टेंबरपासून वैभववाडी येथून जिल्हाव्यापी बुथनिहाय दौऱ्याला सुरुवात केली जाईल, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.गेली १५ वर्षे भाजपामध्ये प्रामाणिक काम केले. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने जिल्हा उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबाबत असलेले समज-गैरसमज दूर झाल्यामुळे पक्षातील निलंबन मागे घेतले गेले. 

भाजपामधून सुमारे एका वर्षाच्या कालावधीनंतर निलंबन मागे घेऊन बाबा मोंडकर याना जिल्हा उपाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील ९१७ बूथ सक्षमीकरणाची जबाबदारी देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर मालवण येथील हॉटेल महाराजा येथे मोंडकर यांनी पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला उपाध्यक्षपदी संधी दिल्याबाबत पक्षाचे आभार मानले.

यावेळी महेश मांजरेकर, बबलू राऊत, धोंडी चिंदरकर, संतोष लुडबे, प्रकाश मेस्त्री, संतोष गावकर, उल्हास तांडेल, दादा वाघ, संदीप शिरोडकर, आबा पोखरणकर, रश्मी लुडबे, अवी सामंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील वनसंज्ञा, आकारीपड, देवस्थान इनाम, पुनवर्सन आदी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भविष्यात शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. शासकीय जागेत अतिक्रमण करून उभारली घरे नव्या शासन निर्णयानुसार अधिकृत करून जिल्ह्यातील गरीब जनतेला न्याय मिळवून देताना भाजपच्या संघटना वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे मोंडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.कायद्याची अंमलबजावणी करून घेऊ!ज्ञानेश देऊलकर यांनी संपूर्ण आयुष्य मच्छिमार समाजासाठी पणाला लावले. त्याप्रमाणे भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर शासन निर्णय पारित केले. मच्छिमार व स्थानिक पर्यटन व्यवसायासाठी धोरण निश्चित केले.

भाजपा मच्छिमार नेते देऊलकर यांच्या कार्यावर काम करत असून पर्ससीन मासेमारीबाबत शासनाने काढलेल्या अध्यादेशांची अंमलबजावणी मत्स्य विभागाकडून करून घेतली जाईल. आमचा पर्ससीन मासेमारीला विरोध असल्यामुळे आमच्या सरकारने बनविलेल्या कायद्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुजोर अधिकाऱ्यांना जागा दाखवून देऊ, असाही इशारा मोंडकर यांनी दिला.

टॅग्स :BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग