शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सिंधुदुर्ग : नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानची २६ पासून विश्वास यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:52 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत विश्वास यात्रा २०१८ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देनारायण राणेंच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानची २६ पासून विश्वास यात्राशेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास सरकार अपयशी : दत्ता सामंत 

सिंधुदुर्गनगरी : महागाई वाढ, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. सत्तेमध्ये असलेल्या पालकमंत्री, खासदार आमदार यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास उडाला आहे.

जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, जनतेला आधार देण्यासाठी तसेच विद्यमान सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्याचा भकास कसा केला आहे हे पटवून देण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत विश्वास यात्रा २०१८ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.सामंत म्हणाले की, गेली चार वर्षे राज्यात युती शासनाची सत्ता आहे. मात्र या कालावधीत महागाई वाढत आहे. शेतकºयांच्या समस्या जैसे थे आहेत. गॅसचे भाव वाढत आहेत. विज बिलांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. आणि या समस्या सोडविण्यास महाराष्ट्र सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे असा आरोपही दत्ता सामंत यांनी केला आहे.त्याशिवाय सत्ताधाऱ्यांमध्ये असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचा जिल्ह्याच्या प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. या सत्ताधाऱ्यांवर जनतेने टाकलेला विश्वास ते सार्थकी लावू शकलेले नाहीत.

त्यामुळे त्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळे जनतेला आधार देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये आपल्या पक्षाचा विश्वास निर्माण करण्यासाठी तसेच सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्याचा केलेला भकास जनतेला दाखविण्यासाठी स्वाभिमान पक्षाच्यावतीने पक्षाचे संस्थापक खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विश्वास यात्रा २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे.आगामी निवडणूकीत स्वाभिमानचीच लाट : दत्ता सामंतसत्तेत असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी जनतेचा विश्वास घात केला आहे. त्यामुळे पक्षाच्या विश्वास यात्रेद्वारे जनतेमध्ये स्वाभिमान पक्षाचा विश्वास निर्माण केला जाणार आहे. आगामी निवडणुकीत स्वाभिमान पक्षाची लाट असणार असून जिल्ह्यातील तिन्ही आमदार व खासदार हा स्वाभिमान पक्षाच असणार असल्याचा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग