शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: जळगाव येथील खून प्रकरणातील दोघे संशयित मालवण मधून ताब्यात

By अनंत खं.जाधव | Updated: July 27, 2024 23:25 IST

Sindhudurg News: जळगाव येथील किशोर सोनवणे खून प्रकरणात फरार असलेल्या दोघा संशयित आरोपींना मालवण – कुंभारमाठ येथे पकडण्यात आले आहेत. ही कारवाई शनिवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. 

सावंतवाडी - जळगाव येथील किशोर सोनवणे खून प्रकरणात फरार असलेल्या दोघा संशयित आरोपींना मालवण – कुंभारमाठ येथे पकडण्यात आले आहेत. ही कारवाई शनिवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. 

अमोल कोळी (३०) व निलेश सपकाळे (३५) दोघे रा. शनिवार पेठ जळगाव अशी त्यांची नावे आहेत. यासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर यांनी तब्बल ६३ किलोमीटर पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. ते घटनेनंतर काहि दिवस सावंतवाडी तालुक्यातील आजगाव परिसरात लपून बसले होते.याबाबतची माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार  पोलिसांचे पथक  सावंतवाडीत दाखल झाले होते. मात्र पोलिसांचा सुगावा लागल्यानंतर ते मालवणच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले.

मात्र या संशयित आरोपीचा  पाठलाग करून कुंभारमाठ मालवण येथे ताब्यात घेण्यात आले.हा खुनाचा प्रकार दोन महिन्यापूर्वी जळगाव येथे पूर्व वैमनस्यातून ७ ते ८ तरुणांनी किशोर यांची एका हॉटेलमध्ये घुसून हत्या केली होती. हा प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून पुढे आला होता. दरम्यान त्यातील ४ संशयित आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर अन्य काही जण फरार आहेत. त्यातील दोघे प्रमुख सूत्रधार हे आजगाव येथे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जळगाव पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात येत होता.परंतु पोलिसांचा सुगावा लागल्यामुळे ते दोघे कार गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्नात होते.मात्र पोलीस वालावलकर यांनी आपल्या गाडीने पाठलाग करून त्यांना कुंभारमाठ येथे ताब्यात घेतले आणि जळगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव