शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : दोन होड्या जाळल्या, दोन बुडविल्या एक कामगार ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:21 IST

कर्ली खाडी पात्रालगत कोरजाई-गाडेधाववाडी येथील अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन होड्या जाळल्या, दोन होड्या बुडवल्या तर वाळू रॅम्प तोडून एका परप्रांतीय कामगाराला ताब्यात घेण्यात आले आहे. वेंगुर्ले महसूल व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त धडक कारवाई केल्याची माहिती तहसीलदार शरद गोसावी यांनी दिली आहे.

ठळक मुद्देदोन होड्या जाळल्या, दोन बुडविल्या एक कामगार ताब्यात अनधिकृत वाळू उत्खनन : वेंगुर्ले महसूल, पोलीस प्रशासन यांची संयुक्त धडक कारवाई

सिंधुदुर्ग : कर्ली खाडी पात्रालगत कोरजाई-गाडेधाववाडी येथील अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन होड्या जाळल्या, दोन होड्या बुडवल्या तर वाळू रॅम्प तोडून एका परप्रांतीय कामगाराला ताब्यात घेण्यात आले आहे. वेंगुर्ले महसूल व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त धडक कारवाई केल्याची माहिती तहसीलदार शरद गोसावी यांनी दिली आहे.अनधिकृत वाळू उत्खनन बाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या नंतर विविध गेले दोन दिवस वेंगुर्ला महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन या अनधिकृत वाळू उत्खनन वर कारवाई करत आहेत. सकाळी वेंगुर्ले महसूल व पोलीस प्रशासनाने कर्ली खाडी पात्रालगत कोरजाई-गाडेधाव वाडी येथे धडक कारवाई केली.यात तहसीलदार शरद गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी गायकवाड, पोलीस केरकर, अनिकेत सावंत, पोलीस पाटील चव्हाण, घोलेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.वाळू माफियांचे धाबे दणाणलेया कारवाईत अनधिकृत वाळू उत्खननास वापर होत असलेल्या ४ होड्या पाण्यात बुडविण्यात आल्या तर दोन होड्या जाळण्यात आल्या तसेच अनधिकृत रित्या उभारण्यात आलेले वाळू रॅम्पही उध्वस्त करण्यात आले.

यावेळी एका परप्रांतीय कामगाराला ताब्यात घेण्यात आले असून एका कामगाराने पलायन केले. अशाच प्रकारचे अनधिकृत वाळू उत्खनन वेंगुर्ला शहरानजिक एका ठिकाणी रात्रीच्या वेळेस जोरदार सुरू आहे. याचा शोध घेऊन यावरही महसूल विभाग व पोलीस प्रशासन धडक कारवाई करणार काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून या करवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग