सिंधुदुर्ग : पतंग महोत्सवातून पर्यटनवृद्धी: दीपक केसरकर, निधी देण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 18:02 IST2018-02-13T17:56:37+5:302018-02-13T18:02:28+5:30
शासनाकडून पर्यटन महामंडळामार्फत निधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पतंग महोत्सव भेटीत केले.

पतंग महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
सिंधुदुर्ग: माझा वेंगुर्ला संस्थेने पतंग महोत्सवातून पर्यटनवृद्धीचा प्रयत्न यशस्वीपणे राबविला आहे. देशी-विदेशी पर्यटकांची हजेरी मोठ्या प्रमाणात असेल अशा ठिकाणी भरविल्या जाणाऱ्या महोत्सव वा उपक्रमासाठी भविष्यात निधीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शासनाकडून पर्यटन महामंडळामार्फत निधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पतंग महोत्सव भेटीत केले. वेंगुर्ले बंदर ते नवाबाग जोडणारा झुलता पर्यटन पूल मे महिन्यापूर्वी पूर्ण होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
माझा वेंगुर्ला संस्थेने पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवाबाग समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय पतंग महोत्सवास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत पंचायत समिती सभापती यशवंत परब, नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश परब, उभादांडा ग्रामपंचायतीचे सरपंच देवेंद्र्र डिचोलकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख विवेक आरोलकर, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, पंचायत समिती सदस्य सुनील मोरजकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, सुनील डुबळे, नगरसेविका सुमन निकम, तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष सचिन वालावलकर, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, ह्यमाझा वेंगुर्लाह्ण ग्रुपचे निलेश चेंदवणकर, राजन गावडे, खेमराज कुबल, शशांक मराठे, कपिल पोकळे, जयंत बोवलेकर, राजेश घाटवळ, अमोल प्रभूखानोलकर, श्रीकृष्ण झांटये, अवधूत नाईक, वसंत तांडेल, प्रशांत आपटे, शरद मेस्त्री, सूर्यकांत खानोलकर, पंकज शिरसाट यांच्यासह अन्य सर्व सदस्यांचा समावेश होता.
पतंग महोत्सवात स्थानिकांनी लावलेल्या विविध प्रकारच्या खाद्य स्टॉलना, वाळूशिल्पांना माजी आमदार राजन तेली, भाजपाचे सरचिटणीस शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, ग्लोबल कोकण संस्थेचे संजय यादव, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यासह अन्य मान्यवरांनी तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.