शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :मालवणातील फोटो स्टुडिओ चोरीप्रकरणी रायगडातून तीन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 15:33 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ फोडीतील चोरीचे कॅमेरे व अन्य साहित्य खरेदी केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी रायगड येथून तीन संशयितांना ताब्यात घेत रविवारी अटक केली. दरम्यान, दोन किमती कॅमेरे, एक लॅपटॉप व एक चोरीची दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

ठळक मुद्देमालवणातील फोटो स्टुडिओ चोरीप्रकरणरायगडातून तीन संशयित ताब्यात कॅमेरे, लॅपटॉप, दुचाकी जप्त

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ फोडीतील चोरीचे कॅमेरे व अन्य साहित्य खरेदी केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी रायगड येथून तीन संशयितांना ताब्यात घेत रविवारी अटक केली. दरम्यान, दोन किमती कॅमेरे, एक लॅपटॉप व एक चोरीची दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.मे महिन्यात मालवण, बांदा, कुडाळ व देवगड येथील फोटो स्टुडिओ फोडून लाखो रुपये किमतीचे कॅमेरे व अन्य साहित्य चोरीला गेले होते. या प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी महेंद्र भामा अवचटकर (३४, रा. रायगड) याला अटक केली व ५ जूनपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. संशयित अवचटकर याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग पोलिसांनी रायगड वडखळ येथे गेले दोन दिवस तपास मोहीम व धाडसत्र राबविले.पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, कृष्णा केसरकर, संतोष सावंत, जॅक्सन गोन्साल्वीस यांच्यासह मालवण पोलीस अधिकारी अमोल साळुंखे तसेच मंगेश माने, विजय धुरी, सिद्धेश चिपकर हे सहभागी झाले होते.अवचटकर याने चोरी केलेले कॅमेरे व लॅपटॉप रायगड येथे विकले. हे चोरीचे साहित्य खरेदी केल्याप्रकरणी पोलिसांनी निलेश शशिकांत म्हात्रे, रोहन प्रकाश पाटील (२१, दोघेही मोबाईल शॉपी चालक), व वैभव मधुकर तुरे (२१, फोटोग्राफर) या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात दोन किमती कॅमेरे, एक लॅपटॉप व एक दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यातील दुचाकी मुंबई येथून चोरी केल्याची माहितीही पोलिसांनी दिली.आधी मालवण पर्यटन, मग चोरीसंशयित महेंद्र अवचटकर याने मे महिन्यात मालवण येथे पहिली चोरी केली. त्याच्या आदल्या दिवशी तो मालवणात दाखल झाला. सकाळी किल्ले दर्शन केल्यानंतर त्याने चोरी केलेल्या ठिकाणांची रेकी केली. मध्यरात्री समीर फोटो स्टुडिओ फोडून चोरलेले साहित्य शेजारचे एक बंद घर फोडून त्यात ठेवले.

त्यानंतर भरड येथील पाटकर यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरून कानाला हेडफोन लावून झोपलेल्या मुलाचा मोबाईल चोरला. तसेच सर्व साहित्य चोरून सकाळी सहा वाजण्याच्या एसटी बसने पसार झाला, अशी माहिती पोलीस अधिकारी अमोल साळुंखे यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हाPoliceपोलिस