शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

धुक्यात हरवला सिंधुदुर्ग; आंबा, काजू फळांना बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 11:01 IST

सिंधुदुर्ग : गेले आठवडाभर कडाक्याची थंडी अनुभवणाऱ्या सिंधुदुर्गकरांची आज, शनिवारची पहाट दाट धुक्याची दुलई घेऊनच उगवली. सलग दुसऱ्या दिवशी ...

सिंधुदुर्ग : गेले आठवडाभर कडाक्याची थंडी अनुभवणाऱ्या सिंधुदुर्गकरांची आज, शनिवारची पहाट दाट धुक्याची दुलई घेऊनच उगवली. सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या या धुक्यात रिमझिम पडणाऱ्या पावसासारखे दव अंगावर झेलतच अनेकांनी धुक्यातून भटकंतीचा अनुभव घेतला. या दाट धुक्यामुळे वीस फुटाच्या अंतरावरील स्पष्ट दिसत नव्हते. सकाळी नऊनंतर सूर्यदर्शन होत नव्हते. तोपर्यंत अवघी सृष्टी दवांनी चिंब झाली होती. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासूनच धुक्याचे आगमन होते. पण यावर्षी पावसाळाच लांबल्याने किरकोळ दिवसाचा अपवाद वगळता दाट असे धुके पडलेच नव्हते.

शुक्रवारी मात्र अचानक धुक्याने एंट्री केली. शनिवारी यापेक्षा दाट धुके पडले. सलग दुसऱ्या दिवशी धुक्याचा आनंद घेण्यासाठी हौशी नागरिकांनी पाणवठे गाठले. सावंतवाडी शहरातील मोती तलावकाठी धुक्याचे विलोभनीय दर्शन होत होते. आंबा मोहोर गळणार- या धुक्याने आंबा, काजू पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील आठवडाभर पडत असलेल्या थंडीमुळे आंबा, काजू पिकाला पोषक वातावरण होते. उरलेला सुरलेला आंबा मोहोरायला सुरूवात झाली होती. मात्र, आता गेले दोन दिवस पडत असलेल्या धुक्यामुळे आंबा, काजू मोहोर धुक्याने जळून जाणार आहे.- यासाठी काही खबरदारी घेण्याचे आवाहन मुळदे कृषी संशोधन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. त्यानुसार बागेत रात्रीच धुर करावा. जेणेकरून उष्णता राहून मोहरगळ कमी होईल.

वाहने लाईट लावूनच- दाट धुके असल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत होती.- नदीजवळ, ओहोळ, तलावाजवळ तर धुके इतके होते की पाच फुटांवरचेही स्पष्ट दिसत नव्हते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गweatherहवामान