शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

सिंधुदुर्ग : उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 4:53 PM

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत घरगुती गॅस जोडणीसाठी उपलब्ध असलेली यादी सदोष आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरु करावी, अशा सक्त सुचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्दे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा कणकवली दक्षता समिती बैठकीत नीतेश राणे यांच्या सक्त सुचना

कणकवली : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत घरगुती गॅस जोडणीसाठी उपलब्ध असलेली यादी सदोष आहे. त्यामुळे अनेक गरजू लाभार्थी वंचित राहिले आहेत. त्याना लाभ देण्यासाठी 'विस्तारित उज्ज्वला योजना 2 ' जाहिर करण्यात आल्याचे जरी सांगितले गेले तरीही याबाबतची माहिती सर्वसामान्यांपर्यन्त अजूनही पोहचलेली नाही. ती लोकापर्यन्त पोहचण्यासाठी पेट्रोलियम कंपन्या , एजन्सी व तहसीलदार कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात यावी. नवीन नावे समाविष्ट करण्यासाठीची कार्यपध्दती लोकांना समजावून सांगून गरजूना या योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरु करावी, अशा सक्त सुचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या आहेत.कणकवली तालुका दक्षता समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या यादीत गरजू लाभार्थ्यां ऐवजी सधन व्यक्तींची नावे असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सुचनांनुसार कणकवली तहसीलदार कार्यालयात शुक्रवारी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार नीतेश राणे बोलत होते.यावेळी पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे, नगराध्यक्ष समीर नलावडे, तहसीलदार संजय पावसकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, भारत पेट्रोलियमचे गोवा विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक मथुरा बैद्य उपस्थित होते.यावेळी उज्ज्वला गॅस योजनेच्या अनुषंगाने विविध मुद्दे उपस्थित झाले. तसेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशाच्या आधारे तयार करण्यात आली ? या यादीत गरजू लाभार्थी वंचित राहिल्याचे दिसून येत आहे. त्याला कारणीभूत असलेल्यांवर काय कारवाई करणार ? असा सवाल आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित केला.यावेळी भारत पेट्रोलियमचे मथुरा बैद्य यांनी 2011 च्या शासनाच्या यादिनुसार या याद्या तयार केल्या आहेत. त्यानंतर कोणत्याही नवीन याद्या करण्यात आलेल्या नाहीत. एप्रिल 2018 मध्ये ही योजना आणखीन विस्तारित करण्यात आली आहे. त्यावेळी अंत्योदय लाभधारक महिला, प्रधानमंत्री आवास योजना लाभधारक , एससी, ओबीसी पात्र लाभार्थी यांच्या निकषांच्या आधारे समावेश करण्यात आला.तर त्यानंतर आता योजना आणखी विस्तारित करत सर्वसाधारणसाठीही काही निकषांच्या आधारे गॅस जोडणी देण्याची सोय करण्यात आली असल्याचे बैद्य यांनी सांगितले. याबाबत कंपन्यांकडून एजन्सीना कळविण्यात आलेले असल्याचे सांगण्यात आले असले तरीही इण्डेनच्या प्रतिनिधिंकडून याबाबत माहिती नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आमदार राणे यांनी नाराजी व्यक्त केली.शासनाने गरजू व पात्र लाभार्थ्याना योजनेचा लाभ देण्यासंदर्भात निकषांत केलेले बदल सर्व एजन्सी पर्यन्त पोहोचण्याची गरज आहे. तसेच एजन्सीकडून ते सर्व सामान्यांपर्यन्त गेले तरच त्याचा लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत देण्यात आलेल्या लाभामध्ये काही लाभार्थी चुकीचे व पूर्वी गॅस जोडणी असलेले आहेत.

याबाबत काय कार्यवाही करणार ? असा सवालही आमदार राणे यांनी उपस्थित केला. गरजू लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठीच आम्ही ही बैठक आयोजित केली आहे. आतापर्यन्त आम्हाला योजनेतील तरतुदी, विस्तारित योजना याबाबत माहितीच दिली जात नव्हती. आता जी माहिती येथे देण्यात आली ती माहिती लोकांपर्यन्त पोहचून त्याना लाभ मिळवून देण्यासाठी कंपन्या, एजन्सी व पुरवठा विभागाकडून कार्यवाही करण्यात यावी असे आमदार राणे यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेविका मेघा गांगण ,अभिजीत मुसळे, शामल म्हाड़गूत, संदीप नलावडे, अण्णा कोदे, दिलीप वर्णे व इतर अधिकारी , कर्मचारी ,सदस्य उपस्थित होते. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग