शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ऊस तोडणी यंत्राची मसुरेत यशस्वी चाचणी, सिंधुदुर्ग बॅक, डी. वाय. पाटील कारखान्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 15:02 IST

ऊस उत्पादकांसाठी वरदान असलेले ऊस तोडणी यंत्र सिंधुदुर्गात दाखल झाले आहे. सिंधुदुर्ग बँक व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या प्रयत्नातून दाखल झालेल्या या यंत्राच्या सहाय्याने मालवण तालुक्यातील मसुरे आणि वेरळ गावात ऊस तोडणी सुरू करण्यात आली आहे. यंत्राद्वारे होत असलेल्या ऊस तोडणीची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी शनिवारी पाहणी केली.

ठळक मुद्देऊस तोडणी यंत्राची मसुरेत यशस्वी चाचणीसिंधुदुर्ग बॅक, डी. वाय. पाटील कारखान्याचे प्रयत्न

सिंधुदुर्ग : ऊस उत्पादकांसाठी वरदान असलेले ऊस तोडणी यंत्र सिंधुदुर्गात दाखल झाले आहे. सिंधुदुर्ग बँक व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या प्रयत्नातून दाखल झालेल्या या यंत्राच्या सहाय्याने मालवण तालुक्यातील मसुरे आणि वेरळ गावात ऊस तोडणी सुरू करण्यात आली आहे. यंत्राद्वारे होत असलेल्या ऊस तोडणीची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पाहणी केली.तोडणीसाठी कामगार मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. मालवण मसुरे-वेरळ भागातील ऊस कामगार नसल्याने तोडायचा राहिला होता. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर व पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून तसेच सिंधुदुर्ग बँक व डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या प्रयत्नातून निपाणी येथून ऊस तोडणी यंत्र मागविण्यात आले.

मसुरे-मार्गाचीतड येथे आलेल्या यंत्राद्वारे दिलीप बागवे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू करण्यात आली. दिवशी १२० टन ऊस तोडणीची क्षमता या यंत्रात आहे. मसुरे परिसरात शिल्लक असलेला ऊस या यंत्राच्या सहाय्याने तोडून कारखान्याकडे पाठविला जाणार आहे.सिंधुदुर्गात सर्वप्रथम शनिवारी वेरळ गावात यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणीला सुरुवात झाली. त्याची पाहणी करण्यासाठी संग्राम प्रभुगावकर छोटू ठाकूर, मसुरे सरपंच लक्ष्मी पेडणेकर, पुरुषोत्तम शिंदे, जग्गू टेलर, शेतकरी दिलीप सावंत, बाळकृष्ण बागवे, संजय परब, गोविंद मसुरकर, पांडुरंग सावंत तसेच साखर कारखान्याचे एस. एस. पवार, भागोजी शेळके, प्रवीण रासम आदी उपस्थित होते.

यंत्राव्दारे ऊस तोडणी सुरू : सतीश सावंतसतीश सावंत म्हणाले, ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांची टंचाई असल्याने उत्पादक शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता सिंधुदुर्गातही यंत्राद्वारे ऊस तोडणी सुरू झाली आहे.पुढील हंगामात कणकवली, वैभववाडी परिसरात दोन ते तीन यंत्रे ऊस तोडणीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी चार मीटर सरीने ऊस लागवड व ऊसातील तणाची साफसफाई यावर लक्ष देणे आवश्यक आहे.ऊसशेतीचे क्षेत्र विस्तारण्यास तोडणी यंत्राची मदत होणार असून शेतकऱ्यांकडे आर्थिक समृध्दी येणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी नदीतील गाळामुळे पुराचे पाणी शेतामध्ये घुसून नुकसान होते आदी समस्या सावंत यांच्याकडे मांडल्या.

सिंधुदुर्गात दाखल झालेल्या ऊस तोडणी यंत्रामार्फत मसुरे मार्गाचीतड, वेरळ भागातील ऊस तोडणी शनिवारी करण्यात आली. त्याची पाहणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संग्राम प्रभुगावकर, छोटू ठाकूर आदींनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSugar factoryसाखर कारखाने