सिंधुदुर्ग : सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता धारेवर, विजेच्या समस्यांबाबत बांदावासीयांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 15:31 IST2018-06-06T15:31:23+5:302018-06-06T15:31:23+5:30
बांदा शहरातील वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. रात्र पाळीसाठी शहरात दोन लाईनमनची नियुक्ती करणे, वारंवार वीज गायब होणे, जीर्ण वीज खांब, जीर्ण वीजवाहिन्या, भरमसाठ वीज बीले या प्रश्नांबाबत बांदा उपसरपंच अक्रम खान यांनी अभियंता राजे यांना धारेवर धरले.

सावंतवाडी उपविभागीय अभियंता अमोल राजे यांना बांदा उपसरपंच अक्रम खान, जावेद खतीब यांनी जाब विचारला.
सिंधुदुर्ग : बांदा शहरातील वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. रात्र पाळीसाठी शहरात दोन लाईनमनची नियुक्ती करणे, वारंवार वीज गायब होणे, जीर्ण वीज खांब, जीर्ण वीजवाहिन्या, भरमसाठ वीज बीले या प्रश्नांबाबत बांदा उपसरपंच अक्रम खान यांनी अभियंता राजे यांना धारेवर धरले.
आम्हांला केवळ आश्वासने नकोत, कार्यवाही हवी आहे. जोपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही होत नाही, तोपर्यंत शहरात कोणीही वीज बील भरणार नाहीत. दरम्यानच्या काळात कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी शहरातील सर्व समस्या येत्या पंधरा दिवसांत सोडविण्याचे आश्वासन राजे यांनी ग्रामस्थांना दिले.
बांदा शहरातील वीज समस्यांबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामार्फत सोमवारी बांदा कार्यालयात सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांना घेराओ घालण्यात आला होता. त्यावेळी फोनवरून सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांनी मंगळवारी बांद्यात येण्याचे मान्य केले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ते बांदा कार्यालयात हजर झाले.
यावेळी अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, स्वाभिमानचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, बाबू पटेकर, गजानन गायतोंडे, साई धारगळकर, संदीप सावंत, सुभाष मोर्ये यांनी अभियंता राजे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
बांदा शहरात रात्रीच्या वेळी कोणतीही समस्या उद्भवल्यास कर्मचारी उपलब्ध नसतात. त्यामुळे रात्रपाळीसाठी कायमस्वरूपी दोन कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील बहुतांशी वीज खांब जीर्ण झाले आहेत.