शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'कान्स' चित्रपट महोत्सवात सिंधुदुर्गच्या सुपुत्राची छाप, ‘बनी' चित्रपटाचा फर्स्टलूक आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 17:54 IST

मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची पहिली 'झलक' पाहिल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करताच प्रेक्षकांनी त्यासोबत सेल्फी, छायाचित्रे काढत आपल्या पसंतीची पावती दिली.

अनंत जाधवसावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाणेली येथील सुपुत्र चित्रपट निर्माते शंकर धुरी यांच्या ‘बनी' या चित्रपटाचा फर्स्टलूक ७५ व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट इंडिया महोत्सवादरम्यान पॅव्हेलियनमध्ये करण्यात आला. याला चांगला प्रतिसाद मिळाला.आपला चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चित्रपटाचे निर्माते, कलावंत वेगवेगळ्या कल्पक योजना आखतात. ठिकाणे निवडतात. आपले प्रमोशन इतरांपेक्षा वेगळे असावे, रसिकांनी त्याची दखल घेऊन आपली कलाकृती पाहण्याची उत्सुकता दाखवावी, चार कौतुकाचे शब्द बोलावेत यासाठी हा सगळा प्रपंच सुरू असतो. अशीच एक चमकदार कल्पना आखून निर्माते शंकर धुरी दिग्दर्शक नीलेश उपाध्ये यांनी प्रत्यक्षात उतरविली आहे.‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित बनी' या चित्रपटाचा फर्स्टलूक ७५ 'कान्स' आंतरराष्ट्रीय महोत्सवादरम्यान इंडिया पॅव्हेलियन'मध्ये करण्यात आला. या मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची पहिली 'झलक' पाहिल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करताच प्रेक्षकांनी त्यासोबत सेल्फी, छायाचित्रे काढत आपल्या पसंतीची पावती दिली.या चित्रपटाचे निर्माते धुरी हे मूळचे नाणेली (ता. कुडाळ) येथील आहेत. त्यांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षण माणगाव हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण एसपीके महाविद्यालयात झाले. १९९९ पासून ते चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. गेली अनेक वर्ष अनेक यशस्वी चित्रपटांच्या निर्मितीची कार्यकारी धुरा त्यांनी सांभाळली आहे.नवोदित दिग्दर्शक नीलेश उपाध्ये यांच्या सृजनशील विचारांसोबत निर्मितीच्या अनुभवांचं भारदस्त गाठोडं घेऊन पदार्पण करणाऱ्या निर्माते शंकर धुरी यांची बनी' ही पहिली कलाकृती असून, ती नीट आणि आशयपूर्ण पद्धतीने आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी कान्सचे व्यासपीठ निवडल्याचे म्हटले आहे.

आपला मराठी चित्रपट सीमोल्लंघन करून जगभरातील जिज्ञासू, रसिकांसमोर यापूर्वीच पोहोचला आहे. चित्रपटाचा विषय आणि त्याविषयीचं कुतूहल निर्माण करण्याचं काम गेली अनेक वर्षं आपले मराठी चित्रपट चोख करीत आहेत. जगभरातील सुजाण प्रेक्षक आपल्या चित्रपटांचे मनःपूर्वक कौतुक करतात, तेव्हा खरा आनंद होतो. - शंकर धुरी, निर्माते, बनी

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcannes film festivalकान्स फिल्म फेस्टिवल