शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

समुद्री घोड्यांच्या संवर्धन, प्रजनन प्रकल्पासाठी सिंधुदुर्गची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:09 IST

संदीप बोडवे मालवण: सिंधुदुर्गच्या समुद्रात समुद्री घोड्यां च्या अधिवासा बरोबरच त्यासाठीची पोषक परिस्थिती असल्याकारणाने याठिकाणी समुद्री घोड्यांसाठी संवर्धन, प्रजनन ...

संदीप बोडवेमालवण: सिंधुदुर्गच्या समुद्रात समुद्री घोड्यां च्या अधिवासा बरोबरच त्यासाठीची पोषक परिस्थिती असल्याकारणाने याठिकाणी समुद्री घोड्यांसाठी संवर्धन, प्रजनन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. समुद्री घोड्यांची संख्या वाढवून त्याच्यासाठी आवश्यक असणार्‍या अधिवासाच्या निर्मितीसाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) वनविभागाच्या ‘कांदळवन प्रतिष्ठान’ पुढाकार घेतला आहे. समुद्री घोड्यांच्या संख्येला आणि अधिवासाला असलेला धोका लक्षात घेऊन ‘बीएनएचएस’ने सिंधुदुर्गामध्ये समुद्री घोड्यांसाठी संवर्धन प्रजनन प्रकल्प तयार करण्याचे ठरविले आहे. हा प्रकल्प सात कोटी रुपयांचा असून, यामाध्यमातून समुद्री घोड्यांचे प्रजनन आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणार्‍या अधिवासाची निर्मिती करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात आचरा किंवा मिठमुंबरी या भागात संवर्धन प्रजनन केंद्र उभारण्याचा ‘बीएनएचएस’ने ठरविले आहे. या केंद्रासाठी ‘बीएनएचएसएन’ने आवश्यक असलेली जागा शोधण्याची आणि त्यासाठीच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. भारतात समुद्री घोड्यांच्या अंदाजे सात प्रजाती

  • ‘सी हॉर्स’ म्हणजेच समुद्री घोडा हा अस्थिमत्स्य वर्गातील एक मासा आहे. भारतात समुद्री घोड्याच्या अंदाजे सात प्रजाती सापडतात. त्यापैकी ‘हिम्पोकॅम्पस कुडा’ म्हणजेच ‘यलो स्पॉटेड सीहॉर्स’ ही एकमेव प्रजात महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात आढळते. ही प्रजात कांदळवन, खाड्या, समुद्री गवतांचे प्रदेश, खडकाळ किनारे अशा काही अधिवासांमध्ये आढळते. 
  • या प्रजातींचा वापर मत्स्यपालन आणि चिनी औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याची तस्करी होते. भारत, थायलंड, व्हिएतनाम आणि फिलीपिन्स हे समुद्री घोड्यांचे मुख्य निर्यातदार आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या प्रजातीचा व्यापार ५० हून अधिक राष्ट्रांमधून होतो. ‘भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यां’तर्गत प्रथम श्रेणीत समुद्री घोडे संरक्षित आहेत. 

सिंधुदुर्गात प्रामुख्याने समुद्री गवत आणि समुद्री शेवाळ सापडते. यापैकी सरगॅसम ही समुद्री शैवालाची प्रजाती तारकर्ली, वायरी व सिंधुदुर्गच्या अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळते. तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आजूबाजूला समुद्री गवताचे काही भाग आहेत. सिंधुदुर्ग च्या समुद्रात सी हॉर्स चा अधिवास असणे हे येथील चांगल्या समुद्री पर्यावरणाचे द्योतक आहे. - सारंग कुलकर्णी, सागरी जीव संशोधक 

सिंधुदुर्गच्या किनारी समुद्री भागात समुद्री घोड्यांसाठी पोषक परिस्थिती आहे. याठिकाणी तारकर्ली, देवबाग, दांडी, आचरा, कुणकेश्वर, मीठमुंबरी सह संपूर्ण किनारपट्टीवर अनेकदा पावसाळ्याच्या दिवसात मासेमारी जाळ्यात समुद्री घोडे सापडून येतात. मासेमारी जाळ्यात सापडलेले समुद्री घोडे पुन्हा समुद्रात सोडून दिले जातात - ऋतुज देऊलकर स्कुबा प्रशिक्षक

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्ग