शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : एक लाखाच्या दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:24 IST

बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर बांदा पोलीस तपासणी नाक्यावर बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कारवाई केली आहे. गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तेलंगणा राज्यातील पर्यटकांविरोधात ही कारवाई करण्यात आली. १ लाख ३ हजार रुपयांच्या दारूसह तब्बल सात लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देएक लाखाच्या दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्ततिघांना अटक : बांदा तपासणी नाक्यावर पोलिसांची कारवाई

बांदा : बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर बांदा पोलीस तपासणी नाक्यावर बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कारवाई केली आहे. गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तेलंगणा राज्यातील पर्यटकांविरोधात ही कारवाई करण्यात आली. १ लाख ३ हजार रुपयांच्या दारूसह तब्बल सात लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बसचा चालक सुधाकर सायना डी (४३, राहणार तेलंगणा), सुरेश रामराव सनकीनैनी (४०), राजू इलैया रागम, (४०) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल आशिष लावंघरे, धनंजय नाईक, ए. डी. टिळेकर यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास केली.बांदा पोलीस तपासणी नाक्यावर बुधवारी गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती.बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारी लक्झरी बस (टीएस.०७, युए.०७८०) तपासणीसाठी थांबविण्यात आली. तपासणी दरम्यान, बसमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा गोवा बनावटीचा दारूसाठा आढळून आला.

गोवा बनावटीच्या विविध अकरा प्रकारच्या उंची दारूचा साठा सापडला. १ लाख २ हजार ६५५ रुपयांच्या दारूसह सहा लाख रुपये किंमतीची लक्झरी बसही ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दारू कारवाईत लक्झरी बस ताब्यात घेण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गliquor banदारूबंदी