अवैध दारूसाठा जप्त

By admin | Published: May 19, 2017 04:25 AM2017-05-19T04:25:24+5:302017-05-19T04:25:24+5:30

अवैधरित्या दारूविक्री करण्यात येणाऱ्या हॉटेलवर हिंजवडी पोलिसांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कारवाई केली. तिघांना अटक करत त्यांच्याकडून ४ हजार ९९० रुपये

Illegal liquor seized | अवैध दारूसाठा जप्त

अवैध दारूसाठा जप्त

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : अवैधरित्या दारूविक्री करण्यात येणाऱ्या हॉटेलवर हिंजवडी पोलिसांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कारवाई केली. तिघांना अटक करत त्यांच्याकडून ४ हजार ९९० रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल नारायणराव भुदाडे (वय ४२, रा. विमाननगर, येरवडा) सुनील प्रल्हाद जोशी (वय ७९, रा, भूगाव) एकलव्य मलिक (वय ३२, रा. भूगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक संभाजी होळकर यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अवैध दारूविक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Illegal liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.