शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : महामार्गाचे काम पुन्हा थांबविले, ओसरगाव ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:23 IST

कणकवली शहरासह तालुक्यात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओसरगाव येथील महामार्गावर पावसाचे पाणी साचले होते. तसेच भरावाची माती लगतच्या शेतीत गेल्याने ओसरगावचे सरपंच प्रमोद कावले आणि शेतकऱ्यांसह, ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी पुन्हा महामार्गावरील काम बंद पाडत गाड्या अडविल्या.

ठळक मुद्देमहामार्गाचे काम पुन्हा थांबविले, ओसरगाव ग्रामस्थ आक्रमक जाब विचारल्यानंतर नुकसानी देण्याचे मान्य

कणकवली : शहरासह तालुक्यात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओसरगाव येथील महामार्गावर पावसाचे पाणी साचले होते. तसेच भरावाची माती लगतच्या शेतीत गेल्याने ओसरगावचे सरपंच प्रमोद कावले आणि शेतकऱ्यांसह, ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी पुन्हा महामार्गावरील काम बंद पाडत गाड्या अडविल्या.महामार्गावर ओसरगाव देऊळवाडी येथे महामार्गाचे काम सुरु आहे. सोमवारीही महामार्गावरील पाणी व माती शेतात गेल्याने नुकसानी झाली होती. मंगळवारीही सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे महामार्गावरील माती शेतात गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने यंत्राच्या सहाय्याने जवळ असलेल्या वहाळातील पाईप फोडल्याने तसेच वहाळाच्या मुखावरच माती गेल्याने पाण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे महामार्गावरच पावसाचे पाणी साचले.त्यामुळे महामार्गावरील सर्व माती महामार्गाच्या बाजूला असलेल्या शेतीत गेल्याने नुकसान झाले.

याचा जाब ओसरगाव येथील सुनील राणे, आदित्य मोरे, आपटे आदी ग्रामस्थांसह सरपंच प्रमोद कावले यांनी ठेकेदाराला विचारला. त्यावेळी ठेकेदाराने शेतीची झालेली नुकसानी देण्याचे आश्वासन दिले. ठेकेदाराच्या आश्वासनानंतर वातावरण शांत झाले.त्यानंतर ठेकेदाराने महामार्गाच्या कामास सुरुवात केली. गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे मात्र महामार्ग चिखलमय झाला आहे. महामार्गावरील गाड्या इतर मार्गाने नेण्यात आल्या. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून कामाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.महामार्गावर सुरु असलेल्या कामामुळे शेतीत माती गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याचा जाब ग्रामस्थांसह ओसरगावचे सरपंच प्रमोद कावले यांनी विचारला.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्गmonsoon 2018मान्सून 2018highwayमहामार्ग