शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

सिंधुदुर्ग : नरडवे महंमदवाडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 6:30 PM

दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या नरडवे महंमदवाडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवा अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दक्षिण कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजन डवरी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे नरडवे महंमदवाडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवा सतीश सावंत यांच्यासह प्रकल्पग्रस्तांचे पाटबंधारे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी : दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या नरडवे महंमदवाडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवा अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दक्षिण कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजन डवरी यांच्याकडे केली आहे.

प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त, सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्या सुटलेल्या नाहीत. याबाबत सोनवडे ग्रामपंचायतीने लेखी पत्रव्यवहार केला. तरीही याकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे या समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवाव्यात अशी मागणी सतीश सावंत यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता राजन डवरी यांना देण्यात आले आहे. यावेळी सतीश सावंत यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मडव, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष मडव, सरपंच अर्चना मडव, उत्तम बांदेकर, संघर्ष समितीचे संजय पवार, भाई बोभाटे, निलेश पवार, नारायण गावडे, गुणवंत सावंत, अनिल परब, सचिन तेली, गणेश बुटाले, जनार्दन गुरव यांसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.या निवेदनात म्हटले आहे, सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर येथील ग्रामस्थांच्या नागरी सुविधांबाबत आपल्याकडे जिल्हा परिषद सदस्य या नात्याने बैठका, चर्चा याद्वारे वेळोवेळी समस्या मांडल्या. ग्रामपंचायतीचे निवेदन दिले.

यावेळी अधीक्षक अभियंता डवरी व उपअभियंता रणखांबे यांच्याशी सरपंचांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार एकही नागरी सुविधा देण्यात आलेली नाही. परिणामी येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाई व वीज समस्या यांचा सामना करावा लागत आहे.

ग्रामसभेच्या ठरावाची प्रत देण्यात आलेली असताना त्याचीही दखल घेतली नाही. आंबडपाल कार्यकारी अभियंता यांनाही भेटून चर्चा करण्यात आली. तरीही सुविधांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा सतीश सावंत आणि नरडवे महंमदवाडी धरण प्रकल्पग्रस्तांनी दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता यांची भेट घेत निवेदन सादर केले.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या सोनवडे तर्फ दुर्गनगर पवारवाडी ते लाडवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावे, नरडवे मुख्य रस्ता (जुना स्टँड) ते नरडवे केटी बंधारा क्र. १ मार्गे सोनवडे मुख्य रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा, पुनर्वसन गावठण ते मठ-पणदूर-कुडाळ-जांभवडे रस्ता खडीकरण डांबरीकरण करावा, दिगवळे-कुपवडे केटी बंधारा ते कुपवडे मुख्य रस्ता खडीकरण डांबरीकरण करावा, नरडवे महंमदवाडी मध्यम पाटबंधारे डावा कालवा मंजूर करून सोनवडे, घाडीगाव, घोडगे, भरणी गावे ओलिताखाली आणावीत, विद्युत समस्या मार्गी लावावी, पुनर्वसन, स्वेच्छा पुनर्वसन, घर, वने यांचे थेट खरेदीद्वारे मानधन जमा करावे, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, नरडवे महंमदवाडी प्रकल्पातील बाधित घरे, जमिनी संपादित कराव्यात.

 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग