शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळाच्या अडवणुकीचा सिंधुदुर्गवासीयांना फटका

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 28, 2024 15:37 IST

नारायण राणेंकडून दखल : विमानसेवा सुरू करण्यासाठी परवानगी नाकारत असल्याने नाराजी

सिंधुदुर्ग : चिपी येथील सिंधुदुर्गविमानतळावरून गोवा येथील फ्लाय ९१ या विमान कंपनीद्वारे मार्च महिन्यापासून सिंधुदुर्ग हैदराबाद सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग बंगळुरू सिंधुदुर्ग या दोन्ही मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून काही दिवस ही सेवा अखंडित सुरू आहे. याच कंपनीकडून सिंधुदुर्ग पुणे सिंधुदुर्ग अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, पुणे येथील विमानतळाकडून ही सेवा सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. यासाठी टाइम स्लॉटचे कारण पुढे करून परवानगी नाकारण्यात येत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.याबाबत आता सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने खासदार नारायण राणे यांच्याशी पत्रव्यवहार करून हवाई वाहतूक मंत्र्यांमार्फत यासाठी प्रयत्न करण्यासाठी साकडे घातले आहेत. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनाही देण्यात आल्या आहेत.

चिपी विमानतळ सुरू होऊन आता तीन वर्षे उलटली आहेत. त्यामुळे विमानतळावरून ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी विविध मार्गातून प्रयत्न सुरू आहे. सध्या अलायन्स एअर या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विमान कंपनीकडून मुंबई महानगराशी जोडणारी विमानसेवा सुरू आहे. त्याला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असतानाही कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे ती सेवा बेभरवशाची ठरत आहे. याला पर्याय म्हणून सिंधुदुर्ग पुणे सिंधुदुर्ग ही सेवा सुरू होणे आवश्यक आहे.

फ्लाय ९१ ची दर्जेदार, उत्तम सेवागोवा येथील फ्लाय ९१ या कंपनीकडून मार्च महिन्यापासून हैदराबाद आणि बंगळुरू या दोन महानगरांमध्ये जाण्यासाठी आठवड्यातून काही दिवस सेवा अखंडित सुरू आहे. काही वेळा खराब हवामान किंवा वादळी वाऱ्याचा फटका बसत असल्याने चिपी येथून विमान उड्डाणे होत नाही. मात्र, त्यादिवशी तेच विमान नजीकच्या गोवा राज्यातील मोपा येथील मनोहर इंटरनॅशनल विमानतळावरून उड्डाण करून प्रवाशांना सेवा देत आहे. चिपी येथे विमान टेकऑफ करताना किवा लँडिंग करत असताना समस्या आल्यास त्या सर्व प्रवाशांची सोय करून मोपा येथून त्यांना सेवा दिली जात आहे.

पुणे येथील सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न आवश्यकफ्लाय ९१ या कंपनीकडून हैदराबाद आणि बंगळुरू येथे सेवा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुणे येथून सेवा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न कंपनीकडून सुरू होते. मात्र, पुणे विमानतळाकडून या कंपनीला टाइम स्लॉटचे कारण दाखवून परवानगी नाकारण्यात आली आहे. ही बाब लक्षात येताच जिल्हा व्यापारी महासंघाने याबाबत खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी पत्रव्यवहार केला असून, हवाई वाहतूक मंत्रालयाकडून याबाबत परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

नारायण राणेंचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्रखासदार नारायण राणे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांना पत्र देऊन सिंधुदुर्ग पुणे विमानसेवा सुरू करण्यासाठी विनंती केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती नीलेश सामंत यांनी याबाबत नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे पुणे येथील विमानतळावरून ही सेवा सुरू करण्यासाठी विमान वाहतूक मंत्रालयाची बैठक घेऊन आपल्यालाही या बैठकीत उपस्थित राहण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPuneपुणेairplaneविमानAirportविमानतळ